Sangola Assembly Election 2024 esakal
सोलापूर

Sangola : आमदार रवींद्र धंगेकरांचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते का झाला? राजकीय चर्चांना उधाण

पंढरपूर-सांगोल्याचं राजकारण सामान्यांना समजण्याच्या पलीकडचं आहे.

सकाळ डिजिटल टीम

सांगोल्यात मराठा आणि धनगर समाजाची ताकद जवळपास समसमान आहे.

पंढरपूर-सांगोल्याचं राजकारण सामान्यांना समजण्याच्या पलीकडचं आहे. त्यातच आता आणखी एक राजकीय बातमी समोर आली आहे. याचा फायदा राष्ट्रवादीला (NCP) होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar) यांचा सत्कार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते का झाला? याचे कोडे अनेकांना पडले आहे. सांगोल्यात मराठा आणि धनगर समाजाची ताकद जवळपास समसमान आहे.

त्यानंतर लोणारी समाज (Lonari Community) इथं निर्णायक आहे. हा समाज आपल्यासोबत ठेवण्यासाठी सांगोल्याच्या राजकारणात आमदार धंगेकर यांचं नाव सत्काराच्या निमित्तानं हाताळण्यात आलं आहे.

2024 च्या सांगोला विधानसभा (Sangola Assembly Election) आखाड्यात आपण उतरणारच असल्याचे संकेत माजी आमदार दीपक साळुंखे यांनी या सत्कार सोहळ्यातून दिले आहेत. सांगोल्यासह पंढरपूर, मंगळवेढा, माढा व करमाळा या तालुक्यात लोणारी समाज कमी-अधिक प्रमाणात आहे. त्यांच्यावरही प्रभाव पाडण्याचा प्रयत्न या निमित्तानं झालेला दिसतो. त्यामुळं धंगेकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते झालेला सन्मान राष्ट्रवादीला बळ देणारा ठरेल का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

SCROLL FOR NEXT