सोलापूर

सोलापूरकरांनो काटकसर करा, अन्यथा... (VIDEO)

विजयकुमार सोनवणे


सोलापूर :  शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या औज बंधाऱ्यात 10 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. या कालावधीपर्यंत उजनी धरणातून पाणी सोडले तर ठिक, अन्यथा कोरोना महामारीच्या साथीत पाणीटंचाईच्या आणखी एका संकटाला सोलापूरकरांना सामोरे जावे लागणार आहे. 

महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली, नगर अभियंता संदीप कारंजे, विभागीय कार्यालय अधिकारी उपस्थित होते. 

उजनी धऱण मायनसमध्ये गेले आहे. अशा स्थितीत धरणातून पाणी कधी व किती वेगाने सोडले जाईल याबाबत अद्याप कोणीच सांगू शकत नाही. तथापि महापालिकेने शहराचा पाणीपुरवठा लक्षात घेता दुबार पंपींगची तयारी केली आहे. औज बंधाऱ्यात दहा जूनपर्यंत पाणी पुरणार आहे. त्याचा कालावधी आणखी दोन ते तीन दिवस वाढवायचा असेल तर बंधाऱ्याच्या परिसरातील औज, चिंचपूर, कुरघोट व टाकळी येथील वीजपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचा पाठपुरावा सुरु असल्याचे सांगण्यात आले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत 10 जूनपूर्वी पाणी सोडण्यासंदर्भात पत्र दिले आहे. उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडल्यावर धरण किती मायनसमध्ये जाणार आहे, त्याचा अंदाज घेऊन शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागणी केल्यानुसार दहा जूनपर्यंत पाणी सोडणार की नाही याबाबत आढावा घेऊन, पुन्हा एकदा जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करून महापालिकेचे नियोजन निश्चित करण्यात येईल, अशीही माहिती यावेळी देण्यात आली. 

सोलापूर शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी 311 कोटींचा आराखडा तांत्रिक मान्यतेसाठी पाठविला होता. त्यात काही त्रुटी आढळल्या, त्या दुरुस्त करून पाठविल्या. लवकरच या आराखड्याला मंजुरी मिळे. सध्या कोरोना महामारीमुळे या प्रकल्पाचे काम थांबले आहे. 
- संजय धनशेट्टी, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका

सोलापूरकरांनो काटकसर करा, अन्यथा... (VIDEO)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT