सोलापूर

शेतकऱ्यांचा 'डीसीसी'वर वाढला भरोसा! खरीपात 112 कोटींचे कर्ज वाटप

तात्या लांडगे

खरीप हंगामात जिल्ह्यातील 23 बॅंकांच्या तुलनेत जिल्हा बॅंकेने सर्वाधिक 111 कोटी 91 लाखांचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली.

सोलापूर : अडचणीतील जिल्हा बॅंकेने आता मागेल त्या शेतकऱ्याला पीक पाहून कर्ज देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तर तीन लाखांपर्यंत विनाव्याजी पीक कर्जही (Crop debt) दिले जात आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांच्या तुलनेत कमी हेलपाटे अन्‌ तत्काळ कार्यवाही होत असल्याने शेतकऱ्यांचा जिल्हा बॅंकेवरील विश्‍वास पुन्हा वाढू लागला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील 23 बॅंकांच्या तुलनेत जिल्हा बॅंकेने सर्वाधिक 111 कोटी 91 लाखांचे कर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली. (solapur district bank has disbursed rs 112 crore in kharif loans)

शंभर वर्षे पूर्ण झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने ग्रामीण अर्थकारणाला मोठा हातभार लावला. कारखानदारी वाढली, अनेकांना रोजगारही मिळाला. रब्बीचा जिल्हा म्हणून असलेली ओळख आता खरीपाचा जिल्हा म्हणून होऊ लागली. मात्र, अनियमित कर्ज वाटप आणि वसुलीतील घटीमुळे बॅंक अडचणीत सापडली. तत्कालीन सरकारने बॅंकेवर प्रशासकाची नियुक्‍ती केली. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोनदा कर्जमाफी (दीड व दोन लाखांपर्यंत) झाली आणि त्यातून बॅंकांची थकबाकी वसूल होण्यास मदत झाली.

प्रशासकांनी काही संस्थांचा लिलाव करून त्यातून थकबाकी वसूल केली. आता बॅंकेचा एसएलआर, सीआरआर चांगला असून राज्य सहकारी बॅंकेकडूनही जिल्हा बॅंकेला कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचा कर्ज मागणीसाठी बॅंकेकडे ओढा वाढत असून लॉकडाउन काळात जिल्ह्यातील एक हजार 16 शेतकऱ्यांनी कर्जासाठी ऑनलाइन अर्ज केले. त्यात सर्वाधिक अर्ज बॅंक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकांचेच असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी दिली.

उद्दिष्ट 1270 कोटींचे; बॅंकांकडून कर्जवाटप 301 कोटींचेच

स्टेटलेव्हल बॅंकर्स कमिटीने (एसएलबीसी) खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बॅंकांनी एक हजार 270 कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. त्यापैकी आतापर्यंत 301 कोटींचेच कर्ज वाटप झाले असून त्यात सर्वाधिक जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना 111 कोटी 91 लाखांचे कर्ज दिले आहे. तर उर्वरित 22 बॅंकांनी खरीपात 200 कोटींचे कर्ज वितरीत केले आहे. बार्शी, माढा, मोहोळ, करमाळा, पंढरपूर, अक्‍कलकोट या तालुक्‍यातून सर्वाधिक कर्ज मागणीचे अर्ज बॅंकांकडे आले आहेत.

एसएलबीसी'ने खरीपासाठी ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार संबंधित बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही निर्देश दिले आहेत. कर्ज मागणीसाठी प्राप्त ऑनलाइन अर्ज संबंधित बॅंकांकडे वर्ग केले असून त्यांनी पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊन त्या शेतकऱ्यास कळविणे क्रमप्राप्त आहे.

- प्रशांत नाशिककर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, सोलापूर

(solapur district bank has disbursed rs 112 crore in kharif loans)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : टीम इंडियाला धक्का! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघातून बाहेर, 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा...

Rabies Death in Kolhapur : जयसिंगपुरात ५ जणांना चावलं पिसाळलेलं कुत्र, एका महिलेचा रेबीजने मृत्यू; ७ वर्षांच्या मुलीवरही हल्ला

Latest Marathi News Live Update : २००२ च्या तरतुदींनुसार अंदाजे १०८ कोटी रुपये किमतीचा १.३५ एकरचा व्यावसायिक भूखंड तात्पुरता जप्त केला आहे- ईडी

Malegaon Protest : मोठी बातमी ! मालेगाव अत्याचार प्रकरणी जनआक्रोश मोर्चाला हिंसक वळण, आक्रमक आंदोलक गेट तोडून कोर्टात घुसले

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

SCROLL FOR NEXT