सोलापूर

पाच हजार बालकांमागे एक बालरोगतज्ज्ञ !

तात्या लांडगे

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अर्लट झाली असून बालरोगतज्ज्ञ आणि बालकांसाठी बेड उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

सोलापूर : शहरात 0 ते 18 वयोगटातील मुलांची (children) संख्या दोन लाख 79 हजार तर ग्रामीणमध्ये नऊ लाख 13 हजार बालके आहेत. तिसऱ्या लाटेत बालके (children) सर्वाधिक कोरोना (Corona) बाधित होतील, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे चार हजार 946 बालकांमागे एक बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) अशी डॉक्‍टरांची संख्या आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अर्लट झाली असून बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) आणि बालकांसाठी बेड उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. (Solapur has one pediatrician for every five thousand children)

बालकांना ताप येणे, धाप लागणे, उलटी होणे अशी लक्षणे असल्यास त्यांचे वेळेत निदान करणे गरजेचे असून अशा मुलांना इतर लोकांपासून दूर ठेवायला हवे. कोरोना पॉझिटिव्ह बालकांवर त्यांच्या घरी उपचार केले जाणार आहेत. परंतु, त्याला सौम्य अथवा लक्षणेच नसायला हवीत. मध्यम, तीव्र, अतितीव्र लक्षणे असलेल्या बालकांना रूग्णालयातून उपचार दिले जाणार असून त्यांच्यासोबत एक पालक राहू शकणार आहे.

शहर-जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञांची संख्या कमी असल्याने सध्याच्या काही कोविड रूग्णालयातूनही त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. शहरात बालरोगतज्ज्ञांची 16 रूग्णालये असून त्याठिकाणी 409 बेड आहेत. गरजेनुसार त्याचा वापर कोरोनाग्रस्त बालकांसाठी केला जाईल, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ संस्थेच्या शहराध्यक्षा डॉ. वैशाली शिरशेट्टी यांनी दिली. तत्पूर्वी, आपली मुले कोरोनापासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने प्रत्येक पालकांनी दक्ष राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञांची संख्या 150 पर्यंत असून त्या सर्वांना तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीणमधील 13 तर शहरातील चार रूग्णालयांमध्ये बालकांवरील उपचाराची सोय केली जात आहे. 17 रूग्णालयांमध्ये बालकांसाठी 280 बेडची व्यवस्था केली असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 40 बेड असणार आहेत.

- डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

बालके सुरक्षित राहण्याकडे झेडपीचे लक्ष

ग्रामीण भागातील कोरोनाची दुसरी लाट आता कमी होऊ लागली असून त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे कार्य कौतुकास्पद आहे. गावोगावच्या डॉक्‍टरांवरील कारवाई, घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांचा सर्व्हे, पाच हजार लोकसंख्येच्या प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर, सरपंच, ग्रामसेवक, गटविकास व गटशिक्षण अधिकाऱ्यांना कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल कारवाईची नोटीस, कोरोना चाचणीत वाढ, रूग्णांना मार्गदर्शन, माझे गाव कोरोनामुक्‍त गाव अभियान, अशा विविध उपाययोजना त्यांनी केल्या. त्यामुळे रूग्णसंख्या आता पाचशे ते सहाशेने कमी झाली असून मृत्यूही कमी होत आहेत. आता तिसऱ्या लाटेपासून बालके कोरोनापासून सुरक्षित राहावीत म्हणून त्यांनी अंगणवाडी व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून मुलांची यादी घेऊन त्यांच्या आरोग्याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे.

बालक अन्‌ बालरोगतज्ज्ञांची स्थिती

शहरातील डॉक्‍टर : 91

ग्रामीणमधील डॉक्‍टर : 150

बालकांची संख्या (0 ते 18) : 11.92 लाख

उपचारासाठी रूग्णालये : 17

एकूण बेडची सोय : 280

(Solapur has one pediatrician for every five thousand children)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT