mahatma gandhi esakal
सोलापूर

Solapur : महात्मा गांधींच्या अभियानामुळे कुष्ठरोग नियंत्रणात

शहरात ३.२७ लाख कुटुंबांची तपासणी; २७ कुष्ठरुग्ण उपचाराधीन; नव्याने आढळले आठ रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : योग्य उपचार पद्धतीद्वारे कुष्ठरुग्णांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या अभियानामुळे कुष्ठरोग नियंत्रणात आले. सोलापूर शहरात २७ कुष्ठरुग्ण उपचाराधीन असून, तपासणी मोहिमेत नव्याने आठ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, अशा रुग्णांबाबत समाज समूहाची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रह आंदोलनामुळे जितके आमूलाग्र बदल देशात झाले, तितक्याच प्रभावीपणे कुष्ठरुग्णांसाठी सुरू केलेल्या अभियानामुळे आज कुष्ठरोग नियंत्रणात आहे. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त कुष्ठरोग निर्मूलनासाठी देशभरात मोहीम राबविली जाते. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान झोपडपट्टी व अतिजोखीम परिसरातील ३ लाख २७ कुटुंबांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नव्याने आठ रुग्ण आढळून आले. रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी ही मोहीम प्रभावी काम करते.

कुष्ठरोग : लक्षणे व उपचार

मायको लेप्री नावाच्या जिवाणूंमुळे कुष्ठरोग होतो. हे जंतू खूप सावकाश वाढतात. म्हणून हा आजारही खूप सावकाश वाढतो. या जिवाणूंच्या संसर्गाने त्वचेमध्ये अस्वाभाविक बदल होतात. या आजारामुळे कायमचे दिव्यांगत्व येते. या व्यक्तीच्या त्वचेच्या संपर्कात आल्याने आणि तिच्या शिंकेतून हे जिवाणू इतरांना बाधित करू शकतात. त्यामुळे या रुग्णांना समाज प्रवाहात सामावून घेतले जात नाही. समाजापासून हे रुग्ण दुरावले जातात. परंतु त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू झाल्यास हा आजार बरा होतो. समाजामध्ये त्यांना पुन्हा स्थान निर्माण करून देण्यासाठी महात्मा गांधींचे हे अभियान आणखी प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.

इतिहास कुष्ठरोगाचा

हॅन्सन या शात्रज्ञाच्या नावावरून कुष्ठरोग ओळखला जातो. १८७३ साली त्याने या रोगाचा कारक ‘मायकोबॅक्टेरियम लेप्री’चा शोध लावला. या जिवाणूंच्या संसर्गाने त्वचेमध्ये अस्वाभाविक बदल होतात. या बदलास विकृतिस्थल म्हणतात. त्वचेवरील हे भाग वेड्यावाकड्या आकाराचे आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांची कड गडद रंगाची आणि मध्यभाग फिकट रंगाचा दिसतो.

प्रतिबंधात्मक उपाय

लागण झालेल्या रुग्णांना बहुविध औषधोपचाराच्या मदतीने संसर्ग खंडित करणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जंतुसंसर्गाचे प्रमाण कमी होते.

सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता राखणे

निदान, तपासणी आणि चाचणी

पुरेशा सूर्यप्रकाशात राहणे

मोहिमेचा उद्देश

नवीन कुष्‍ठरुग्‍णांना लवकरात लवकर शोधले जाणे

कुष्‍ठरोगाविषयी गैरसमज अथवा भीती कमी करणे

समाजामध्‍ये कुष्‍ठरुग्‍णांचा सहभाग वाढविणे

उपचार पद्धतीमध्ये सातत्य राखणे

कुष्ठरुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणणे

सावकाश वाढ १२ ते १४ दिवस

श्वसनसंस्था/नाक, त्वचा संपर्कातून प्रसार

रोगाचा संसर्ग कोणत्याही वयात होतो

स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये प्रमाण अधिक

सामाजिक व वातावरणातील घटक

सामाजिक-आर्थिक घटक, गरिबी, गर्दी, स्वच्छतेचा अभाव, कोंदटपणा

स्थलांतरामुळे दूरीकरणावर परिणाम व प्रसाराचे प्रमुख कारण

घृणा व बहिष्कृत होण्याची भीती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT