smc 
सोलापूर

"यांच्या' स्वाक्षरीविना रखडली "इतक्‍या' महापालिका कामगारांची वार्षिक वेतनवाढ; कामगार संघटना आक्रमक 

तात्या लांडगे

सोलापूर : दरवर्षी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जुलैअखेर वेतनवाढ देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. विभागप्रमुखांनी वेतनवाढीसाठी पात्र असलेल्या सुमारे पाच हजार कामगारांचे प्रस्तावही आयुक्‍तांकडे पाठविले. मात्र, जुलै महिना संपून आता ऑगस्ट सुरू होऊनही आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी त्या प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे कामगार संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी सोमवारी (ता. 3) दहा प्रमुख मागण्यांचे निवेदन उपायुक्‍त पंकज जावळे यांच्याकडे सोपविले. 

सोलापूर महापालिकेत कायमस्वरूपी सुमारे पाच हजार कर्मचारी आहेत. त्यांना नियमानुसार दरवर्षी वेतनवाढ मिळण्याबाबत लेखा अनुदानातून बजेटमध्ये तरतूद केलेली असते. मात्र, मागच्या वर्षी आणि मागील सहा महिन्यांत महापालिकेच्या उत्पन्नात साडेतीनशे कोटींची घट झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर वेतनवाढीचा प्रश्‍न जाणीवपूर्वक लांबणीवर टाकला जात असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे. कोरोना महामारीत कुटुंबाचा व स्वत:चा जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्‍न आयुक्‍तांनी तत्काळ निकाली काढावेत; अन्यथा ठोस भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही श्री. जानराव यांनी या वेळी दिला. 

महापालिका आयुक्‍तांचे "वर्क फ्रॉम होम'च 
शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्‍तांनी कार्यालयात येऊन काम करण्याची आवश्‍यकता आहे, जेणेकरून कामगारांचे मनोबल व मनोधैर्य वाढण्यास मदत होईल. मात्र, आयुक्‍त मागील काही दिवसांपासून कार्यालयात येतच नाहीत. त्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केल्याने अनेक प्रश्‍न प्रलंबित राहिले आहेत. कामगार असो की नगरसेवकांचे फोन घेण्यासही त्यांना वेळ नाही. आयुक्‍तांनी कार्यालयात येऊन काम करावे, कामगारांचे प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावेत, अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी केली आहे. 

कामगार संघटनेच्या दहा प्रमुख मागण्या 

  • हजेरीसाठी बायोमेट्रिक ही एकच पद्धत असावी 
  • रजा काढण्यासाठी घातलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात 
  • महापालिकेच्या दहा कामगारांवरील कारवाई मागे घ्यावी 
  • कोरोना महामारी बरी होईपर्यंत कामगारांना अल्पोपाहार व बसची सुविधा द्यावी 
  • कामगारांच्या वार्षिक वेतनवाढीच्या प्रस्तावावर आयुक्‍तांनी स्वाक्षरी करावी 
  • बालवाडी शिक्षिका व अन्य कर्मचाऱ्यांना मुदतवाढ द्यावी 
  • तीन महिन्यांपासून सुटी, रजा न घेता ज्यादा काम करणाऱ्यांना कामाचा वाढीव मोबदला द्यावा 
  • भवानी राम सिकची धर्मशाळा चालू करून त्या ठिकाणी कामगारांसाठी कोव्हिड केअर केंद्र सुरू करावे 
  • राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार 50 वर्षांवरील व गरोदर महिला, दिव्यांग कर्मचाऱ्यांना सवलत द्यावी 
  • कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत करावी; तुर्तास पाच लाख द्यावेत 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT