solapur university
solapur university esakal
सोलापूर

Solapur : क्रॉस व्होटिंग अन्‌ बाद मतांचा फटका

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत अन्य मतदारसंघ वगळता ‘पदवीधर’मध्ये क्रॉस व्होटिंग व बाद झालेल्या मतांचा फटका ‘सुटा’सह अन्य पराभूत उमेदवारांना बसला. युवासेनेकडून ॲड. उषा पवार यांनी बाजी मारली, पण संभाजी ब्रिगेडचे उमेदवार सचिन खुळे यांना पराभव स्वीकारावा लागला.

सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघटनेने (सुटा) संभाजी ब्रिगेड व युवासेनेला प्रत्येकी एक जागा पदवीधरसाठी दिली होती. काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनाही उमेदवारी दिली होती. लेबर फेडरेशनचे संचालक शंकर चौगुले यांनीही ‘सुटा’कडूनच उमेदवारी दाखल केली होती. सुरवातीला काहींनी मिळून, पण निवडणूक जवळ आल्यावर प्रत्येकाने आपापल्या पातळीवर प्रचार केला. प्रचारावर अधिक भर दिलेल्या उमेदवारांनी आपण विद्यार्थ्यांसाठी काय करणार आहोत, हे सांगितले. पण, मतदान कसे करायचे, हे सांगायला कमी पडले.

त्यामुळे ३५० ते ९०१ मते बाद झाली. साडेआठ हजारांपैकी ४८ टक्केच मतदान झाले होते. त्यातही मतदान मोठ्या प्रमाणावर बाद झाले आणि क्रॉस वोटिंग झाल्याने अनेकांना अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागल्याचे पाहायला मिळाले. सिनेटच्या पदवीधरमधून राजाभाऊ सरवदे, ॲड. नीता मंकणी, उषा पवार, यतिराज होनमाने, वर्षाराणी कामूर्ती, चन्नबसप्पा बंकूर, अजिंक्य देशमुख, गणेश डोंगरे, सचिन गायकवाड, अजितकुमार संगवे यांनी विजय मिळवला.

युवासेनेकडून जल्लोष

‘सुटा’कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या युवासेनेच्या पदाधिकारी उषा पवार यांनी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजय मिळविला. या पार्श्वभूमीवर युवासेनेतर्फे पार्क चौकातील कार्यालयासमोर शनिवारी (ता. १) जल्लोष करण्यात आला. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, सचिन बागल आणि गणेश इंगळे, लहू गायकवाड, स्वप्नील वाघमारे, किशोर देशमुख, महेश भोसले, राहुल गंधुरे, किरण भांगे, राम कांबळे, ऋषीकेश धाराशिवकर, लखन शिंदे, प्रसाद नीळ, तुषार आवताडे, प्रथमेश तपासे, अथर्व चौगुले, विक्रम भोसले, अभिषेक सूळ, बबिता काळे आदी उपस्थित होते. गुलालाची उधळण करून विजयी उमेदवार उषा पवार यांना पेढे भरविण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांचाही पवार यांच्या विजयात मोठा वाटा राहिला.

..अन्‌ गणेश डोंगरे यांची संपली धाकधूक!

विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजय संपादित केल्याबद्दल शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांचा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. काँग्रेस भवनाबाहेर जल्लोषही झाला. यावेळी भटक्या विमुक्त सेलचे शहराध्यक्ष भारत जाधव, प्रवक्ते हसीब नदाफ, हाजीमलंग नदाफ, परिवहन समितीचे माजी सदस्य तिरुपती परकीपंडला, श्रीकांत वाडेकर, शुभम माने, दशरथ गायकवाड, संजय बनसोडे, सुधीर टोणपे, शुभम शिराळ, युवराज दोडमणी, चंद्रकांत नाईक, दिनेश डोंगरे, अबुजर सय्यद, सुनील सारंगी, धीरज खंदारे, वैभव घोडके आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. २०१७ मध्ये डोंगरे यांचा नऊ मतांनी पराभव झाला होता.

यतिराज होनमानेंची बाजी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत यतिराज होनमाने यांनी विद्यापीठ विकास मंचकडून विजय मिळविला. शुक्रवारी (ता. ३०) रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. टप्प्याटप्प्याने निकाल हाती येत होते. सर्वांचीच धाकधूक वाढली होती. अशा स्थितीत यतिराज होनमाने यांनी विरोधी उमेदवारांवर मात करीत सिनेटमध्ये एंट्री केली. त्यावेळी विद्यापीठात उपस्थित तरुणांनी त्यांचा सत्कार करीत जल्लोष साजरा केला. यावेळी ॲड. अमोल कळके, प्रा. नरेंद्र काटीकर, प्रा. गजानन धरणे, डोंगरेश चाबुकस्वार, समर्थ बंडे, मोहन डांगरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT