पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरातील कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी शहरात शुक्रपासून सात दिवस लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी शहरात कडकडीत लॉकडाउन पाळण्यात आला. शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. दूध, हॉस्पिटल, पेट्रोल आणि मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच दुकाने व आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. सात दिवसांच्या लॉकडाउन काळात शहरातील नागरिकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. नागरिकांनी स्वतःहून टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
शहरातील वाढत्या कोरोनाबाधित संख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आजअखेर पंढरपूर शहरात जवळपास 750 हून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. ही संख्या अधिक वाढण्याची भीती आहे. त्यापूर्वीच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपुरात लॉकडाउन जाहीर केला आहे. 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी शहरात कडक लॉकडाउन पाळण्यात आला. तरी शहरातून मोटारसायकलवरून मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी दंडात्मक करवाई केली.
हेही वाचा : Big Breaking ! विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी मिळणार नाही... कोण म्हणाले? नक्की वाचा
पोलिसांनी सकाळी शहरातील रस्त्यांवर फिरून लोकांना घरातच बसून राहण्याचे आवाहन केले. हॉटस्पॉट असलेल्या घोंगडे गल्ली, विठ्ठल मंदिर परिसर, नाथ चौक, उत्पात गल्ली, संतपेठ, सांगोला रोड आदी परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे व पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनीही दिवसभर फिरून आढावा घेतला. लॉकडाउनमुळे शहरातील बेघर लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने नाश्त्याची सोय केली आहे. येथील एसटी बसस्थानकात आश्रयाला असणाऱ्या निराश्रित लोकांना अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत होते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही शहरातून मोकाट फिरणाऱ्या 85 लोकांवर कारवाई करण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी सांगितले.
दिवसभरात 97 जणांची कोरोना चाचणी
लॉकडाउन काळात अधिकाधिक लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशानाने घेतला आहे. शुक्रवारी शहरातील परदेशी नगर भागात रॅपिड अँटिजेन चाचणी कॅम्प लावण्यात आला होता. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने चाचणी करण्याचे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत या भागात राहणाऱ्या 97 नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी केली. यामध्ये समाधानाची बाब म्हणून तब्बल 92 जणांचे आवाहन निगेटिव्ह आले तर फक्त पाचजण पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी शहरातील मनीषानगर आणि गजानन महाराज मठ येथे चाचणी सुरू आहे.
सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर घरीच उपचार
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील सहा खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यामध्ये उपचार सुरू आहेत. रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्ह आलेल्या व सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर त्यांच्याच घरी उपचार सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. परंतु यासाठी संबंधित रुग्णांच्या घरी आवश्यक सोयी असतील तरच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आणि पंढरपूर इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पंकज गायकवाड यांनी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.