Agitation Canva
सोलापूर

"पाच टीएमसीचा निर्णय रद्द करा, अन्यथा पाटबंधारे कार्यालयात घुसू !'

उजनीच्या गेटवर सलग सातव्या दिवशी आंदोलन सुरू आहे

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांनी उजनीतील (Ujani Dam) पळविलेल्या पाच टीएमसी पाण्याबाबतचा आदेश रद्द करावा, तशा आशयाचे लेखी पत्र मिळावे यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh, President of Janhit Shetkari Sanghatana) यांनी उजनीच्या मुख्य गेटजवळ सुरू केलेल्या आंदोलनाचा (Agitation) सोमवारी सातवा दिवस असून, आंदोलनस्थळी अद्याप एकही जबाबदार शासकीय अधिकारी फिरकला नसल्याने कुठल्याही क्षणी पाटबंधारे कार्यालयात घुसून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे. (The agitation is going on for the seventh day in a row at the gate of Ujani)

दरम्यान, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य ऍड. बाळासाहेब पाटील यांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंब्याचे पत्र देशमुख यांना दिले आहे. तर आंदोलन परिसरातील व माढा तालुक्‍यातील अनेक ग्रामपंचायतींनी न्यायालयीन लढाईसाठी व आंदोलनात सहभागासाठी ग्रामपंचायतीचे ठराव दिले आहेत. सांडपाणी या गोंडस नावाखाली पालकमंत्र्यांनी उजनीतील पाच टीएमसी पाणी पळविण्याचा घाट घातला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तर धरणातील पाणी कमी झाल्याने भविष्यात ऊस लागवड कमी होणार आहे. याचा थेट परिणाम साखर कारखान्यांवर होणार आहे.

गेल्या सहा दिवसांपासून आंदोलनस्थळी एकही अधिकारी फिरकला नाही. यामुळे कुठलीही पूर्वसूचना न देता पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांसह घुसून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन तीव्र करणार असल्याचे लेखी पत्र देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहे. दरम्यान, हा सर्व गदारोळ पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावरून उजनीतील एक थेंबही पाणी घेणार नाही. विरोधकांनी त्यांची पोळी भाजण्यासाठी चुकीची माहिती प्रसारित करीत असल्याचे सांगितले आहे.

गेले विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्‍शन तोडू नका, असे आदेश दिले होते. मात्र अधिवेशन संपताच ऊर्जामंत्री यांनी पुन्हा वीज कनेक्‍शन तोडण्याचे आदेश दिले. त्या वेळी उपमुख्यमंत्री पवार गप्प बसले. त्यामुळे उजनीतील पाच टीएमसी पाणी घेणार नाही, या त्यांच्या म्हणण्यावर कसा विश्वास ठेवावा, असेही देशमुख म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला महिलांना ३,००० रुपये मिळणार? फक्त एकच अडचण; पण कोणती? जाणून घ्या...

TET Result Date: टीईटी उमेदवारांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपर्यंत लागणार निकाल

Makar Sankranti 2026: एकाच दिवशी 4 दुर्मिळ योगायोग! सूर्यदेव कोणत्या वाहनावर होणार स्वार?

Nashik Municipal Election : दिवे कुटुंबाची 'सहावी' इनिंग; काँग्रेसचा हात सोडून हाती घेतले 'धनुष्यबाण' आणि 'कमळ'!

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६' समारंभाचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT