Mahalung Canva
सोलापूर

युवकांनी सोडवला माकडांच्या अन्नपाण्याचा प्रश्न ! विविध स्तरांतून सुरू मदतीचा ओघ

युवकांनी सोडवला महाळुंग येथील माकडांच्या अन्नपाण्याचा प्रश्न

प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर (सोलापूर) : लॉकडाउनमुळे (Lockdown) गरीब, असहाय्य व बेघर लोकांची उपासमार घडत आहे. दानशूर व सेवाभावी संस्थांतर्फे या लोकांची भूक शमवली जात आहे. मात्र मुक्‍या प्राण्यांचं काय? महाळुंग येथील माकडांची (Monkeys) उपासमार होत होती. त्यांची होणारी उपासमार गट नंबर दोन येथील युवकांना पाहवलं नाही. त्यांनी त्याबाबत सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट व्हायरल करून मदतीचे आवाहन करत माकडांच्या अन्न-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यामुळे माकडांसाठी सर्व स्तरातून खाद्यपदार्थांचा ओघ सुरू झाला आहे. परिणामी माकडांच्या अन्न-पाण्याची समस्या सुटली आहे. (The youth solved the problem of food and water for the monkeys in Mahalung)

महाळुंग येथील यमाईदेवी मंदिराच्या परिसरात 400 ते 500 माकडे आहेत. सध्या लॉकडाउन सुरू असल्याने तेथील दुकाने, बाजार, मंदिर व गाव बंद आहे. मंदिर बंद असल्याने भाविकांची तेथील वर्दळ पूर्णपणे थंडावली आहे. त्यामुळे तेथील माकडे अन्न-पाण्यासाठी वणवण भटकत होती. ही बाब गट नंबर दोन येथील युवक रामचंद्र धंगेकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी गावातील हरी साबळे, विशाल शिंदे, अनिल कांबळे या मित्रांना सोबत घेऊन आसपासच्या परिसरात मदतीचे आवाहन केले.

शेतकऱ्यांनी पाण्याअभावी सोडून दिलेले केळी, काकडी, टोमॅटो, कोबी गोळा करून माकडांची भूक भागविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सर्वत्र पसरली. माकडांची उपासमार होऊ नये यासाठी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे भागातून देखील दानशूर मदत पाठवू लागले आहेत. सोशल मीडियामुळे पाच हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत माकडांसाठी मिळाली आहे.

अनेकजण अन्नपदार्थ, फळे, भाजीपाला, बिस्किटे मदत म्हणून देत आहेत. महाळुंग गावातील संजयकुमार घोंगाणे, अभिजित मुंडफणे यांनी माकडांसाठी आलेले अन्नपदार्थ ठेवण्यासाठी तेथे एक गाळा उपलब्ध करून दिला आहे. गट नंबर दोन येथील युवक दररोज चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महाळुंगला जाऊन माकडांच्या अन्नपाण्याची व्यवस्था पाहत आहेत. अकलूजच्या जैन बांधवांनी देखील माकडांसाठी अन्नपदार्थ पुरविले आहेत. लॉकडाउन असेपर्यंत एकाही माकडाचा अन्न-पाण्यावाचून भूकबळी जाऊ देणार नाही, असा निर्धार हरी साबळे, रामचंद्र धंगेकर व त्यांच्या मित्रांनी केला आहे. तसेच माकडांसाठी मदतीचे आवाहनही त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandu Andekar House Raid : पुणे पोलिसांकडून बंडू आंदेकरच्या घराची झडती, कोट्यवधींचं घबाड सापडलं...

मोठी बातमी! फेब्रुवारी ते ११ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे २३९९ कोटींचे नुकसान; १९.४८ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात, तरी सरकारकडून मिळाली नाही दमडीचीही मदत

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2025

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'Veggie Pancakes', सोपी आहे रेसिपी

आनंदाची बातमी! 'राज्यात एक लाख काेटींची गुतवणूक'; कोकण, नाशिक अन् विदर्भात ४७ हजार रोजगार निर्माण होणार, मुख्यमंत्र्यांची सामंजस्य करारावर स्वाक्षरी

SCROLL FOR NEXT