There is no Corona patient in Solapur district 
सोलापूर

जिल्हाधिकारीसाहेब याकडे गाभीर्याने पहा, अन्यथा...

अशोक मुरुमकर

सोलापूर : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग धास्तावले आहे. कारण दररोज लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना योग्य नियोजनामुळे सोलापुरात मात्र, अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. यात जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचे नियोजन आणि सरकारच्या सूचनांची अमंलबाजणी महत्त्वाची ठरत आहे. यामुळे आपण निम्मी लढाई जिंकली आहे. परंतु आता याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्याला गाभीर्याने घेण्याची गरज आहे. लॉकडाऊनमुळे कामगार, निर्धार, भिक्षेकरी यांची गैरसोय होऊ नये म्हणून निवारागृह उभारले असले तरी अद्याप अशा शेकडो लोकांवर रस्त्यावर फिरण्याची वेळ येत आहे.


हेही वाचा : निम्मी लढाई जिंकली! सोलापुरात अद्याप एकही नाही कोरोनाचा रुग्ण
रेल्वे स्टेशन परिसरात रात्री लोक जागा मिळेल तिथे झोपत आहेत. त्यांच्या जेवणाचा प्रश्‍न नाही. रात्री त्यांना पदपथावर झोपावे लागत आहे. दिवसभर ते कोठे असतात याचा शोध घेणे गरजे आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी न करणे हा एकच उपाय आहे. दुर्लक्षामुळे काही ठिकाणी गर्दी होत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात रात्री भिक्षेकरी व इतर लोक झोपत आहेत. ‘सकाळ’ने मंगळवारी मध्यरात्री शहरात पाहणी केली तेव्हा रस्त्यावर गर्दी करुन नागरिक झोपत असल्याचे समोर आले आहे. यातून निवारागृहाचे काय, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवल्याचेही चित्र आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश काय होता?
कोरोना प्रतिबंधासाठीच्या लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील कामगारांसाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल सुविधा स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने राबवण्याची आहे. ही सुविधा नियोजनबध्द व्हावे यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षेतेखाली जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी आणि उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे जिल्ह्यासाठी तर महापालिका क्षेत्रासाठी नगर अभियंता संदीप कारंजे यांची समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचप्रमाणे प्रत्येक तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षेतेखाली तालुकास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने स्वयंसेवी, धर्मादाय, सहकारी, खासगी आदी संस्थांकडून मदत घेवून कामगारांना अन्न व धान्य उपलब्ध करुन देणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा, मदत व पुनवर्सरन विभागामार्फत मिळालेल्या निधीतून मागणी पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे. विस्थापित मजुरांसाठी निवारागृहाची व्यवस्था करावी यासाठी जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या शाळा, महाविद्यालय, समाजमंदीर, मंगल कार्यालय निश्चित करावीत. या ठिकाणी कम्युनिटी किचनच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. आवश्यकतेनुसार आरोग्य सुविधाही उपलब्ध करुन द्याव्यात, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले होते.

हेही वाचा : कोरोना : ...सांगा आमची पोटं गप्प बसणार का?
आदेशात काय आहेत सूचना

  1. कार्यक्षेत्रात सध्या असलेले भविष्यात येणारे स्थलांतरित कामगार, भिक्षेकरी, निराधार, रोजंदारी कामगार यांची माहिती संकलीत करावी.
  2. त्यांच्या राहण्यासाठी शाळा व इतर ठिकाणे निश्चित करावी. तेथे पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह असल्याचे खात्री करावी. नसल्यास बांधकाम विभाग किंवा गट विकास अधिकारी यांच्यामार्फत करावी
  3. या व्यक्तींची वैद्यकीय अधिकाऱ्ंयांमार्फत तपासणी करावी. लागण आढळण्यास डॉक्टरांच्या सल्लयानुसार कारवाई करावी
  4. सदर व्यक्तींची देखरेख करण्यासाठी स्वयंसेवी सस्थांची मदत घ्यावी
  5. कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्था आणि दानशुर व्यक्ती यांची यादी तयार करुन संपर्क करावा
  6. या व्यक्तींसाठी भोजन, चादर, पाणी यांची सोय उपलब्ध करुन घ्यावी
  7. वरील सर्व कामांसाठी उपविभागीय अधिकारी यांनी सर्व यत्रणांची मदत घेवून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे नमूद केले आहे.
  8. यांना करा संपर्क...

नियुक्त समन्वय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे 1) दीपक शिंदे उपजिल्हाधिकारी, मोबाईल 9960600975 email id slao1solapur@gmail.com 2) शैलेश सुर्यवंशी उपजिल्हाधिकारी, मोबाईल7588327994 email id shaileshsurya777@gmail.com 3) संदिप कारंजे, शहर अभियंता सोलापूर महापालिका मोबाईल 9923752375 email id sbkaranje70@gmail.com.
तालुकास्तरावर मदत देऊ तयार असणाऱ्या दानशूर व्यक्तींनी संबंधित तहसिलदारांना संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यानी केले आहे. तहसिलदारांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे: 1) जयवंत पाटील, उत्तर सोलापूर 0217-2731014, 9823722274 2) अमोल कुंभार, दक्षिण सोलापूर 0217-2731033, 7249052004 3) प्रदीप शेलार, बार्शी, 02184-222213, 9881977866 4) अंजली मरोड, अक्कलकोट, 02181-220233, 9921948007 5) चव्हाण, माढा 02183-234031, 9028861778 6) समिर माने, करमाळा, 02182-220357, 9405860348 7) वैशाली वाघमारे, पंढरपूर, 02186- 223556, 9881791009 8) जीवन बनसोडे, मोहोळ 02189-232234, 9764007579 9) स्वप्निल रावडे, मंगळवेढा, 02188-220241, 7385764330, 10) योगेश खारमाटे, सांगोला, 02187-220218, 9765599599 11) अभिजीत पाटील, माळशिरस 02185-235036, 7719955855. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT