ragging carton 
सोलापूर

रॅगिंगविरोधी समितीलाच मिळेना बैठकीसाठी वेळ...'या' विद्यापीठाची स्थिती 

तात्या लांडगे

सोलापूर : विद्यापीठांमधील व त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील विद्यार्थी रॅगिंगचा बळी ठरू नयेत, या हेतूने प्रत्येक विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला दिले आहेत. दरमहा समितीची बैठक घ्यावी, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले असतानाही पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील समितीने नऊ महिन्यांपासून एकही बैठक घेतली नाही. याबाबत प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. विकास कदम अनभिज्ञच आहेत. 


महाविद्यालयात अथवा विद्यापीठात शिक्षण घेताना, वस्तीगृहात राहायला असलेल्या विद्यार्थ्यांना रॅगिंगचा त्रास होणार नाही, याची दक्षता रॅगिंग विरोधी समितीच्या माध्यमातून घेतली जाते. विद्यार्थ्यांना थेट तक्रार करता यावी, यासाठी रॅगिंग विरोधी समितीच्या सदस्यांचे मोबाइल क्रमांक, त्यांची नावे प्रत्येक महाविद्यालयात, विद्यापीठाच्या प्रत्येक विद्याशाखेच्या इमारतीत लावणे आवश्‍यक आहे. मात्र, विद्यापीठाच्या सोशल सायन्स विभागाच्या इमारतीत मागील कित्येक वर्षांपूर्वीच्या रॅगिंग विरोधी समितीचा फलक तसाच आहे. रॅगिंग विरोधी समिती आहे की नाही, त्यामध्ये कोण आहे, रॅगिंग विरोधी समितीतील सदस्यांना संपर्क कसा करायचा, असे अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडले आहेत. तरीही विद्यापीठातील रॅगिंग विरोधी समितीने मागील नऊ महिन्यांपासून त्याकडे गांभीर्याने पाहिल्याचे दिसत नाही. विविध कार्यक्रम व महोत्सवाचे कारण पुढे करीत बैठक घेणे शक्‍य झाले नसल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. 


ठळक बाबी... 

  • विद्यापीठाची समिती अन्‌ समितीचे नियोजन कागदोपत्रीच 
  • नऊ महिन्यात शहरातील फक्‍त 13 महाविद्यालयांनाच भेटी 
  • दरमहा अथवा तीन महिन्यातून एकदा रॅगिंगविरोधी समितीची बैठक नाहीच 
  • मागील नऊ महिन्यात विद्यापीठाने बैठकच घेतली नाही 
  • रॅगिंगविरोधी समितीतील सदस्यांची नावे अन्‌ मोबाइल क्रमांकाचा विद्यापीठाला विसर 


प्रभारी प्र-कुलगुरु रॅगिंगविरोधी समितीबाबत अनभिज्ञ 
राज्यस्तरीय क्रिडा महोत्सव, अविष्कार मोहत्सव, व्यवस्थापन समितीची बैठक यासह अन्य कार्यक्रमांमुळे रॅगिंग विरोधी समितीची बैठक झाली की नाही, याची माहिती नाही. 2019-20 या वर्षातील रॅगिंग विरोधी समितीची बैठक पुढील महिन्यात घेतली जाईल. समिती स्थापन झाली की नाही, त्यामध्ये सदस्य कोण आहेत, याची माहिती घेवून पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल, असे प्रभारी प्र कुलगुरु डॉ. विकास कदम यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

ऑनलाइन परीक्षा घेण्याची सरकारचीच लायकी नाही! संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या परीक्षेत गडबड, अभिजित दिपके संतापले

Godavari flood tragedy: गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, सावखेडा गावात शोककळा

Marathi News Live Updates : ''गोपीनाथ मुंडे काँग्रेससोबत असते तर...''; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान पुन्हा चर्चेत

MPSC Success : कोकडेवाडीच्या शेतकरी पुत्राचा पराक्रम: संजय शितोळे यांची MPSC दुय्यम निबंधक पदावर निवड

SCROLL FOR NEXT