5 ठार, 6 जखमी
5 ठार, 6 जखमी esakal
सोलापूर

'हे' ठरले पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातास कारणीभूत! 5 ठार, 6 जखमी

संतोष पाटील

हा अपघात शनिवारी रात्री साडे अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या सुमारास झाला.

टेंभुर्णी (सोलापूर): पुणे सोलापूर महामार्गावरील भीमानगर येथील ग्यानी ढाब्यासमोर ट्रक व टँकर यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री साडे अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातातील जखमींना टेंभुर्णी व इंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. या दोन्ही वाहनांची धडक झाल्यानंतर ट्रक महामार्गावर आडवा पडल्याने पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. टेंभुर्णी, इंदापूर व महामार्ग सुरक्षा पथकातील अधिकारी व पोलिसांना दिड तासाच्या प्रयत्नानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात यश आले.

या अपघातातील मयताची नावे-

टँकर ड्रायव्हर संजय शंकर कवडे (श्रीपुर तालुका माळशिरस ) , ट्रक ड्रायव्हर शिवाजी नामदेव पवार (वय-30 ),ट्रक मधील प्रवासी वेंकट दंडघुले (पूर्ण नाव माहित नाही रा. सालेगाव ता. लोहारा जि. उस्मानाबाद ) किसन रामलू राठोड ( वय-45 रा. इंदिरानगर कात्रज; पुणे ), सोमनाथ लक्ष्मण माळी ( रा. मोहोळ)

अपघातातील जखमींची नावे- दत्ता अशोक घंटे (वय -29 रा. सालेगाव ता. लोहारा जि. उस्मानाबाद ), व्यंकूसिंग रतन सिंग रजपूत (वय-66 रा. केसर जवळगा ता. उमरगा), गौरी दत्ता रजपुत वय- 33 रा. पुणे ) मीनल दत्ता रजपुत (वय- 4 ), धीरज दत्ता राजपूत (वय-12 ), सुलोचना गोटू सिंग रजपूत(रा. पुणे)

याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, पुणे सोलापूर महामार्गावरील भीमानगर येथील ग्यानी ढाब्यासमोर सोलापूरहून पुण्याकडे जाणारा ट्रक ( एम एच 25 / यु 4045)व पुण्याकडून सोलापूरकडे जाणारा टँकर (एम एच 14 / सीपी 4020) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये ट्रकमधील तीन जण व टँकरमधील एक जण असे एकूण चार जण जागीच ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील दोन्ही वाहनांची धडक एवढी जबरदस्त होती की अपघातातील दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला असून अपघात होताच ट्रक महामार्गावर आडवा झाला. या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, पोलिस उपनिरीक्षक पोपट काशीद, हवालदार अभिमान गुटाळ, बाळासाहेब चौधरी, केशव झोळ, शेख आदी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आले.

इंदापूर येथील पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व पोलिस तसेच महामार्ग सुरक्षा पथकातील पोलिस मदतीला आले. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. विशाल हिरे हे घटनास्थळी आले. या सर्वांनी अपघातील जखमी व मयतांना अपघातग्रस्त वाहनातून बाजूला करून टेंभुर्णी व इंदापूर येथे उपचारासाठी हलविले. तसेच महामार्गावर अपघातग्रस्त ट्रक धडक झाल्याने आडवा पडल्याने महामार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे वाहनांची रांग लागली होती. दिड तासाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी क्रेनच्या साह्याने महामार्गावरील आडवा पडलेला ट्रक बाजूला करून बंद पडलेली वाहतूक हळूहळू सुरू केली. अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी घटनास्थळास भेट दिली.

ठेकेदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत

पुणे सोलापूर महामार्गावरील भीमानगर येथे रस्ता दुरूस्तीचे काम सुरू असल्याने महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे ट्रक व टँकर ची समोरासमोर जोरदार धडक झाली. महामार्गाच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना देखील रस्त्याचे ठेकेदार व रस्त्याची देखभाल दुरूस्तीचे काम करणार्या ठेकेदार यांनी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक फलक लावला नाही हा त्यांनी निष्काळजीपणा केला. त्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलीसांकडून समजले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT