A youth from Vairag has died due to chemical spray poisoning on grapes.jpg 
सोलापूर

वैराग येथील युवकाचा मृत्यू; द्राक्षांवरील रासायनिक फवारणीमुळे विषबाधा झाल्याचा संशय

प्रशांत काळे

बार्शी  (सोलापूर) : वैराग येथील तरुणाचा प्रमाणापेक्षा जास्त द्राक्ष सेवन केल्यामुळे मंदार भाऊराव मोरे ( वय २१, रा .दासरी प्लॉट, वैराग ) या युवकाचा मृत्यू झाला. द्राक्ष पीकावरील रासायनिक फवारणीमुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केला आहे. बार्शी शहर पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

अर्ध्यावरती खेळ मोडला...! भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी
.
वैराग येथील भाऊराव मोरे कुटुंबीय द्राक्ष खाण्यासाठी नांदणी येथील नातेवाईकांकडे गुरुवारी गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर मंदार यास उलट्याचा त्रास जाणवू लागला तसेच मळमळ होत होती. रात्रीच्यावेळी जास्तच त्रास होऊ लागल्याने मंदार यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. मृतदेह रुग्णालयाने ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी दाखल केला. 

ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. शीतल बोपलकर यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. विषबाधा झाल्यामुळे मंदार मोरे याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे, असे डॉ .बोपलकर यांनी स्पष्ट केले. द्राक्ष व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धूवून खाल्ली नसावीत, द्राक्षावर करण्यात आलेली रासायनिक फवारणीमधील औषधांची विषबाधा झाली असावी, असेही डॉ. शीतल बोपलकर यांनी सकाळ शी बोलताना सांगितले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'त्या' जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला होता का? अजित पवार म्हणाले, ''प्रयत्नांती परमेश्वर...''

Kolhapur : ऊसदराचं आंदोलन चिघळलं, आंदोलकांना पोलिसांची धक्काबुक्की; कारखानदारांवर दडपशाहीचे आरोप, Video Viral

Jewellery Shop Robbery Video : ज्वेलरी शॉप लुटण्यासाठी महिलेने दुकानादारांच्या डोळ्यात फेकलं तिखट, पण तिथंच पकडली गेली अन् मग...

महाराष्ट्रातील वारली संस्कृतीचं चित्तथरारक दर्शन घडणार, अंगावर काटा आणणारा ‘असुरवन’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : व्हेल माशाची दीड कोटी रुपयांची उलटी जप्त

SCROLL FOR NEXT