caa bill aandolan photo
caa bill aandolan photo 
पश्चिम महाराष्ट्र

वाचा नक्‍की...'या' शहरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सशक्त, समृद्ध व बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रहित आंदोलन सोलापूरच्या वतीने रविवारी (ता. 5) तिरंगा रॅली पार पडली. या वेळी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. 

नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सी.ए.ए.च्या (भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा) समर्थनार्थ अखिल भारतीय राष्ट्रहित आंदोलन सोलापूर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तिरंगा रॅली काढली. वंदे मातरम, भारत माता की जय, देश का नेतृत्व कैसा हो, मोदीजी जैसा हो, अशा घोषणा देण्यात आल्या. सरस्वती चौक, चार हुतात्मा पुतळामार्गे ही रॅली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विसावली. पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या शेजारील देशांतील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, ख्रिश्‍चन यासह अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांना सहा वर्षांच्या वास्तव्यानंतर भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद असलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत नुकतेच मंजूर करण्यात आले. राष्ट्रहिताच्या दृष्टीने हे बिल अत्यंत महत्त्वाचे व अत्यावश्‍यक असतानाही एनआरसी व सीएएच्या विरोधात जनतेत अपप्रचार व खोटी माहिती दिली जात आहे. काही राजकीय संघटना, व्यक्‍तींकडून त्याला विरोध केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरात ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या वेळी लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी रॅलीतील उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

यांची प्रमुख उपस्थिती... 
खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, माजी महापौर शोभा बनशेट्टी, नगरसेविका राजश्री चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, मनीष देशमुख, चन्नवीर चिट्टे, नीता मंकणी, रुद्रेश बोरामणी, संयोजक सुधीर बहिरवाडे, यतिराज व्होनमाने, अक्षय अंजिखाने, सागर आतनुरे, समर्थ बंडे, किरण जाधव आदी उपस्थित होते. रॅलीची सांगता वंदे मातरमने करण्यात आली. 

मुस्लिमांना विरोध अथवा घटनेचे उल्लंघन नाहीच 
नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारतीय मुस्लिमांचे कोणतेही हक्‍क अथवा नागरिकत्व हिरावून घेणार नाही. काही लोकांनी जाणिवपूर्वक अफवा पसरविली आहे. या दुरुस्तीने घटनेच्या कोणत्याही कलमाचे उल्लंघन होणार नाही. बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांना या कायद्याने बंधने घातली जाणार आहेत. हे तीन देश सोडून इतर देशातून येणाऱ्या मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व मिळू शकेल. 
- ऍड. मंजुनाथ कक्‍कलमेली  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT