Accident on Ratnagiri-Nagpur Highway esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : महामार्गावर भरधाव कारची दुभाजकाला जोराची धडक; अपघातात चालकासह दोघे जागीच ठार

कवठे महांकाळकडं जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर असलेल्या दुभाजकाला जोराची धडक बसली.

सकाळ डिजिटल टीम

गंभीर जखमीला मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर (Ratnagiri-Nagpur National Highway) नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) गावानजीक भरधाव चारचाकी वाहनाची दुभाजकावर जोराची धडक बसून झालेल्या अपघातात चालकासह दोन जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला.

महंमद अरपिल पठाण (वय ३०), इराना सदाशिव हंगरगे (वय २४) दोघे रा. अलमेल ता. सिदगी जि. विजापूर (कर्नाटक) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. हा अपघात (Car Accident) शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक अशी, की चारचाकी वाहन (क्रमांक एम. एच.०३ सी.एम.९५९७) या चारचाकी वाहनामधून मिरजहून त्यांच्या अलमेल (ता. सिंदगी) गावी निघाले होते. दरम्यान, रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नरसिंहगाव येथील गावानजीक आले असता, कवठे महांकाळकडं जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर असलेल्या दुभाजकाला जोराची धडक बसली.

यात महंमद पठाण व इराणा हंगरगे हे दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला (नाव समजू शकले नाही). या गंभीर जखमीला मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला असून यात वाहनाचं मोठं नुकसान झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नेटवर्कवर १०८ वातानुकूलित लोकल गाड्या चालवत

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT