पश्चिम महाराष्ट्र

'उजनी'चे पाणी आरोग्य, जमीन, जनावरांसाठी घातकच

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणात पुणे व परिसरातील एमआयडीसीतून मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्‍त द्रव मिसळत आहे. त्यामुळे धरणातील पाणी मोठ्याप्रमाणावर प्रदूषित होत आहे. परिणामी जमिनीची उत्पादकता कमी झाली असून जनावरांच्या दूध उत्पन्नावर विपरित परिणाम झाल्याचा निष्कर्ष सोलापूर विद्यापीठाने काढला आहे. विद्यापीठातील रसायनशास्त्र, पर्यावरण शास्त्र व सामाजिक शास्त्र संकुलातर्फे धरणातील पाण्याचे नमुने पडताळण्यात आले आहेत. 

उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यातील 51 गावे अन्‌ 47 हजार कुटुंब बाधित झाली. विद्यापीठाकडून सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी दोन तर नगर जिल्ह्यातील एका गावातील 288 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. उजनी धरणातील विविध 11 ठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासणीला घेतले. मात्र, केमिकलयुक्‍त द्रव धरणातील पाण्यात मिसळल्याने पोटाचे विकार वाढले असून जनावरे आजारी पडू लागली आहेत. तरीही सोलापूकरांना नाईलाजास्तव जडत्व असलेले पाणी प्यावे लागत आहे. महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी शुध्द करुन शहराला पुरवठा केले जाते. तरीही पाण्यातील जडत्व जास्त असल्याचा खुलासा महापालिका आयुक्‍त दिपक तावरे यांनी नुकताच केला. 

दरम्यान, धरणातील पाणी शुध्द राहावे, मासेमारीचा व्यवसाय उत्तम चालावा यासाठी धरण परिसरातील एमआयडीसीतून येणारे केमिकलयुक्‍त पाणी थांबवणे काळाची गरज असल्याचे मत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने व्यक्‍त केले आहे. सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ व्ही. पी. धुळप, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. जी. माळी यांनी या संशोधनासाठी पुढाकार घेतला. 

सर्वेक्षणातील ठळक बाबी... 

  • उजनी धरण परिसरातील एमआयडीसीतून मिळसते केमिकलयुक्‍त द्रव 
  • दुषित पाण्यामुळे पुण्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने बसविले जलशुध्दीकरण केंद्र 
  • सोलापूर शहराला उजनी धरणातील शुध्द पाणी देऊनही पाण्यात जडत्व अधिकच 
  • दुषित पाण्यामुळे वाढले जनावरांचे आजार : पिकांच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम 
  • धरण परिसरातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी करावी जलशुध्दीकरण केंद्राची उभारणी 

महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसलेली चाहती, रश्मिका-विजयने घरी बोलावून केला तिच्या आवडीचा 'खास' बेत, Viral Video

Dharashiv News: अवकाळी पाऊस-गारपीटीचा फटका; द्राक्ष, कलिंगड दर कोसळले; १६० रुपयांवरून ७० रुपयांवर द्राक्ष; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Maharana Pratap Descendants : महाराणा प्रताप यांचे वंशज आता कुठे आहेत? कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा महान योद्ध्याचा वारसा

पलूसमध्ये शिक्षण संस्थाचालकाच्या खून प्रकरणाचा ४८ तासात उलगडा, १६ वर्षीय मुलानं पार्किंगमध्येच संपवलं; कारण काय?

Ashok Kharat Files: ''सर्वात जास्त पुरावे तर माझ्याकडे, विरोधी पक्षातले कोण-कोण नेते...'' मुख्यमंत्र्यांचं खरात प्रकरणावर सर्वात मोठं विधान

SCROLL FOR NEXT