Cycle-Kolhapur
Cycle-Kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

सायकलची मोटरसायकल बनविण्याचा नादखुळा छंद!

अर्चना बनगे

कोल्हापूर : काहींना आलिशान गाडीचे वेड असते, काहींना वेगवेगळ्या दुचाकी गाड्यांचा छंद असतो. मात्र, कोल्हापुरातील एका व्यक्तीला वेगळंच वेड लागलंय. या अवलियाने सायकलीला थोडा मॉडिफिरेशनचा टच देत आपल्या जीवनालासुद्धा एक वेगळी किनार दिली आहे.

संजय मंगळे असे या व्यक्तीचे नाव आहे. कोल्हापुरात वास्तव्यास असलेले मंगळे वॉचमन म्हणून एका ठिकाणी नोकरी करतात. संजय मंगळे हे पूर्वी कोडोली (ता. चंदगड) येथे सरपंच होते. त्यानंतर त्यांनी काही काळ पुण्यात नोकरी केली. दहावी शिक्षण झालेल्या या व्यक्तीकडे कौशल्याचा साठा भरपूर आहे. धरणावर वीज निर्मिती प्रकल्पावर त्यांनी काम केले आहे. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले. पुढे खाजगी नोकरी करून त्यांनी पैसे मिळवले. तेव्हा आजारपणामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि वॉचमन म्हणून काम करू लागले.

आरोग्य सांभाळण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांनी सायकल वापरण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी बाजारातून जुनी सायकल खरेदी केली. त्यानंतर त्या सायकलला कल्पकतेने वेगळे रूप द्यायचा, त्यांना छंद लागला. त्यांच्या सायकलला इंडिकेटर आहेत, हॉर्न आहे, रेडिओ आहे, मोबाईल चार्जर आहे. एवढेच नव्हे, तर सायलेन्सरसुद्धा त्यांनी लावला आहे आणि हे सर्व त्यांनी आपल्या कल्पकतेतून तयार केले आहे.

सात दिवस कामावर जाताना ते रोज एक सायकल घेऊन जातात. त्यांच्या सायकलच्या मागे-पुढेही भन्नाट फलक आहेत. या फलकांद्वारे ते समाज प्रबोधन ही करत असतात. 'सबकुछ सायकल' अशा ध्येयाने आपल्या जीवनाला या एक वेगळीच किनार दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT