Political
Political  
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यातील हे दोन विरोधक येणार एकत्र? (Video)

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन होत असल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे नव्याने बांधली जाण्याची शक्यता आहे. मतदारसंघात राजकीय विरोधक म्हणून भाजप एकाकी पडताना दिसत आहे. 

माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असाच राजकीय सामना आतापर्यंत रंगलेला आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व शिवसेनेकडून जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यातच विधानसभा निवडणुका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांचा प्रमुख राजकीय सामना झाला आहे.   माढा विधानसभा ही भाजप-शिवसेना युती शिवसेनेच्या वाट्याला सुटल्यामुळे २०१४ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघात ताकद दाखवण्याची फारशी संधीच मिळाली नाही. 

अशी झाली लढत
२०१९ ला माढा विधानसभा मतदारसंघातील लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच राहिली आहे. सलग सहा वेळा निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व शिवसेनेचे प्रा. शिवाजीराव सावंत एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून पाहिले जातात. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या महाविकास आघाडीमुळे माढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे नव्याने बांधली जाण्याची शक्यता आहे. यामहाविकास आघाडीच्यामुळे आमदार बबनराव शिंदे व प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यातील राजकीय कटुता संपून त्यांच्यामध्ये राजकीय स्नेह वाढणार का याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला हा केवळ  विधानसभेसाठी राहणार की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तो राबवला जाणार यावरही राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. अर्थात हा राजकीय फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राबवला गेल्यास माढा विधानसभा व माढा तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हा फॉर्म्युला भावणार का आणि हा फॉर्म्युला कार्यकर्त्यांमध्ये उतरवण्यात आमदार शिंदे प्रा. सावंत व यशस्वी होणार का असे बरेच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. अर्थात एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या या दोघांचे राजकीय मनोमिलन माढा तालुक्यातल्या राजकीय समीकरणात कळीचा मुद्दा ठरणार आहे. या दोघांचं राजकीय मनोमिलन झाल्यास प्रा. सावंत यांच्यासोबत २०१९ च्या निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार संजय कोकाटे, माजी सभापती शिवाजी कांबळे, जिल्हा दूध संघाचे संचालक राजेंद्र चवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांच्यासह इतर विरोधकही मनोमिलनात सामील होणारा की तटस्थ राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे  महाविकास आघाडीच्या फॉर्मुल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघातील व माढा तालुक्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनतील किंवा राजकीय गुंता सुटून महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असं राजकीय स्वरूप आपणाला पहावयास मिळेल. 

हेही वाचा : राज्यात आजपासून उद्धव सरकार
१४ गावात भाजपची ताकद

एकंदरीतच माढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय पार्श्वभूमीचा विचार केल्यास ही महाविकास आघाडी भाजपवर भारी ठरण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत विधानसभा निवडणुका ह्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपला आपली फारशी ताकद या मतदारसंघात दाखवण्याची संधी मिळाली नाही. किंवा भाजपची या मतदारसंघातील ताकद युतीमुळे मर्यादित राहिलेले आहे. अर्थात सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष दादासाहेब साठे आणि माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माळशिरस तालुक्यातील १४ गावांमधून मोहिते-पाटलांची ताकद भारतीय जनता पक्षाकडे आहे. माढा लोकसभा निवडणुकीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची ताकद काही अंशी बरी दिसली. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनाच मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद नेमकी किती हाही प्रश्न आहे. 

हेही वाचा : आता महामंडळावर कुणाची वर्णी लागणार
शेतकरी संघटनाही महाविकास आघाडीबरोबर

महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीतील ही एकजूट अशीच कायम राहिल्यास व हा फॉर्मुला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लागू झाल्यास भारतीय जनता पक्ष एकाकी पडण्याची शक्यता असून ताकदवान विरोधक म्हणून या मतदारसंघातील पोकळी भरण्यासाठी भाजपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष यासह इतर सहकारी पक्षांना बरोबर घेत ताकद वाढवावी लागणार आहे. विरोधकाची भूमिका बजावणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनाही महाविकास आघाडीबरोबर आहे. त्यामुळे तालुक्यात विरोधक म्हणून भक्कम भूमिका बजावण्याचे भाजपसमोर आव्हानच आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT