पश्चिम महाराष्ट्र

धवलसिंह करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

सकाळ वृत्तसेवा

नातेपुते (सोलापूर) : डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी रविवारी (ता.15) बारामतीमध्ये गोविंदबागेत जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली. यामुळे ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार का या चर्चांना उधाण आले आहे. 

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना धवलसिंह म्हणाले, तालीम संघाच्या अध्यक्षपदी पवार साहेबांची नियुक्ती झाल्याने मी त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो होतो. माझ्यावर कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. देशपातळीवर राज्यातील मल्ल कसे खेळले जातील याविषयी चर्चा झाली. 

विधानसभा निवडणुकीत डॉ. धवलसिंह यांनी जनसेवा संघटनेची ताकद राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी उभी केली. याद्वारे अकलुज व परिसरातून मते मिळवून दिल्याबद्दल श्री. पवार यांनी धवलसिंह यांचे कौतुक केले. हिवाळी अधिवेशनानंतर धवलसिंह यांचे लवकरच पुनर्वसन करू अशा शब्दात श्री. पवार यांनी संकेत दिल्याचे समजते. 

सोलापूर जिल्ह्यात विशेषत: माळशिरस तालुक्‍यात विधानसभा निवडणुकीच्या काळात मला पुरेसे लक्ष देता आले नाही. परंतु येत्या काही दिवसात सगळे मिळून काम करू. राष्ट्रवादीला बळकटी आणू. यासाठी लवकरच मी अकलूजला येणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितल्याचे श्री. धवलसिंह म्हणाले. 

डोळसही सोबत 
धवलसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर माळशिरस तालुक्‍याचे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचे चिरंजीव संकल्प व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. धवलसिंह व संकल्प डोळस एकत्रित पवारांना भेटल्याने माळशिरस तालुक्‍यात चर्चांना उधाण आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT