The work of the primary teacher bank is strange 
पश्चिम महाराष्ट्र

प्राथमिक शिक्षक बॅंकेचा अजब कारभार 

मार्तंड बुचुडे

पारनेर : प्राथमिक शिक्षक बॅंकेतून सभासदांना कर्जवाटप करतानाच, व्याजासह पहिला हप्ता लगेच कपात करून उरलेली रक्कम सभासदाच्या हाती ठेवली जाते. भारतीय रिझर्व्ह बॅंक व सहकार कायद्याला हरताळ फासत बॅंकेकडून सभासदांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. 

प्राथमिक शिक्षक बॅंकेचे जिल्ह्यात सुमारे 10 हजारांवर सभासद आहेत. बॅंकेच्या 975 कोटींवर ठेवी, तर सुमारे 700 कोटींवर कर्जवितरण आहे; मात्र बॅंक सभासदांच्या हितासाठी आहे की संचालकांच्या, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण, सभासदांना कर्जवाटप करताना शिक्षक बॅंक पाच टक्के शेअरची कपात करते. ही कपात नियमानुसार असली, तरी सभासदांच्या हातात पैसे देताना, कर्जाच्याच रकमेतून परतफेडीचा पहिला हप्ता व्याजासह तत्काळ वसूल केला जातो. 
प्राथमिक शिक्षक बॅंकेने पठाणी कर्जवसुलीची पद्धती स्वीकारल्याचे दिसते. कर्ज देताना पहिला हप्ता कपात करून बॅंक कर्जदारांवर अविश्वास दाखवीत असल्याचा आरोप होत आहे. 

अद्याप एकही तक्रार नाही 
कर्ज देताना सभासदांकडून तत्काळ पहिला हप्ता कपात केला जात नाही. तसे केले जात असल्याचे मला तरी माहीत नाही. माझ्याकडे तशी अद्याप एकही तक्रार आलेली नाही. 
- साहेबराव अनाप, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बॅंक 

त्यांच्या परवानगीने हप्ता कपात 
शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. मार्चमध्ये तर खूप उशिरा पगार होतात. अशा वेळी कर्जदार सभासद थकीत दिसतो. सभासदाचे कर्जखाते "एनपीए'मध्ये जाते. त्यामुळे कर्ज देतानाच सभासदास विश्वासात घेऊन, त्याच्या परवानगीने पहिला हप्ता कर्ज देतानाच कपात करून घेतला जातो. 
- अरुण देशमुख, मुख्य व्यवस्थापक, प्राथमिक शिक्षक बॅंक 

ही तर पठाणी वसुली 
कर्ज देतानाच पहिला हप्ता वसूल करण्याची पद्धत म्हणजे पठाणी वसुली आहे. बॅंक सभासदांच्या हितासाठी आहे की सभासदांचे कंबरडे मोडण्यासाठी? बॅंकेत सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. त्याचे परिणाम संचालक मंडळास भोगावे लागतील. 
- रा. या. औटी, माजी अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बॅंक 

पद्धत चुकीची आहे 
कोणतेही कर्जखाते लगेच "एनपीए'मध्ये जात नसते. प्राथमिक शिक्षक बॅंक तर पगारदार सभासदांची आहे. त्यामुळे अशा प्रकारे कर्ज देतानाच परतफेडीचा आगाऊ हप्ता त्याच दिवशी घेणे नियमानुसार नाही. ही पद्धती चुकीची आहे. 
- दिग्विजय आहेर, जिल्हा निबंधक (सहकार) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT