पश्चिम महाराष्ट्र

जाता साताऱ्याला...थालीपीट,पुरणपोळीपासून बिर्याणीपर्यंत सारे काही

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मैदानावर उद्यापासून (ता.13 गुरुवार) 17 फेब्रुवारीपर्यंत मानिनी जत्रा आयोजिली आहे. नागरिकांना जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या दर्जेदार उत्पादनांबरोबरच अस्सल इंद्रायणी, हातसडीचे तांदूळ, लाकडी खेळणी ज्वेलरीबरोबरच थालीपीट, पुरणपोळीपासून खमंग बिर्याणीचाही आस्वाद घेता येणार आहे. याबाबतची महिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिली.
 
यावर्षीची मानिनी जत्रा प्रदर्शन हे संपूर्ण प्लॅस्टिकमुक्त असणार असून, या मानिनी जत्रेचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 14) दुपारी दोन वाजता विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन उद्‌घाटन सोहळा व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या एक हजार महिलांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. मानिनी जत्रेमध्ये 33 राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार विजेत्या स्वयंसहाय्यता समूहांना, तसेच बॅकर्स व पत्रकारांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. मानिनी जत्रेसाठी शासनाकडून दहा लाख रुपयांची तरतूद केली असून, विविध बॅंकांचे प्रायोजकत्व मिळणार आहे.

हे असणार जत्रेत 

मानिनी जत्रेत हातसडीचे तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, चिक्की, विविध मसाले, शुगर फ्री बिस्किटे, सेंद्रिय हळद, लाकडी खेळणी, सेंद्रिय काकवी, गांडूळ खत, स्ट्रॉबेरी, कुरडई, पापड, लोणची, गारमेंट, सॉफ्ट टॉईज, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ (कडधान्य विविध प्रकारचे), इमिटेशन ज्वेलरी नॉव्हेल्टीज, विविध प्रकारच्या चटण्या, सेंद्रिय गूळ, आवळा कॅंडी याचबरोबर शाकाहारी जेवण, थालीपीठ, पुरणपोळीबरोबरच मटण थाळी, चिकण थाळी, बिर्याणी, मच्छीचे स्टॉल सहभागी होणार आहेत. ही जत्रा प्लॅस्टिकमुक्त होणार असून, इको फ्रेंडली कटलरी व ग्लास बचतगटांना जिल्हा परिषदेमार्फत पुरविली जाणार आहेत. मानिनी जत्रेत पुणे विभागातून विविध व्यवसाय करणारे समूह सहभागी होणार आहेत. सर्व नागरिकांनी मानिनी जत्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. 

मुलांसाठी अम्युझमेंट पार्क 

यावर्षी मानिनी जत्रेचे आकर्षण हे लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क, विविध करमणुकीचे कार्यक्रम, स्वयंसहाय्यता समूहांसाठी आरक्षित असणाऱ्या 80 स्टॉल्स व्यतिरिक्त ज्या योजनेकडील समूहांना मोफत स्वरूपामध्ये स्टॉल्स उपलब्ध होऊ शकला नाही, अशा आणखीन 40 स्वयंसहाय्यता समूहांना नाममात्र शुल्कात स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

हेही वाचा : सातारकर संतप्त मुलींनी युवकाला चोपले

वाचा : हवालदाराची पोलिस अधीक्षकांवरच कारवाई

हेही वाचा : दारुड्या मुलाचा बापाने केला खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

Phulambri News : सुवर्ण महोत्सवी सप्ताहात नामस्मरणाचा अखंड गजर, शेलगाव खुर्द येथे हजारो भाविकांची उपस्थिती; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

SCROLL FOR NEXT