पिंपरी-चिंचवड

मावळात दिवसभरात ४७ नवे पॉझिटिव्ह, तर दोन रुग्णांचा मृत्यू      

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात ४७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दोघांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील ८३ वर्षीय महिला व वराळे येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार ३४२ व मृतांची संख्या ४९ झाली आहे. तसेच, ८७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ४७ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १७, इंदोरी येथील १०, लोणावळा येथील पाच, कामशेत येथील चार, वराळे येथील तीन, धामणे, सोमाटणे व कान्हे येथील प्रत्येकी दोन; तर वडगाव व कुसगाव बुद्रुक  येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ३४२ झाली असून, त्यात शहरी भागातील ६८०, तर ग्रामीण भागातील ६६२ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ४३७, लोणावळा येथे १४५ व वडगाव येथील रुग्ण संख्या ९८ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ८७४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

शुक्रवारी ३७ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ४१८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २८० जण लक्षणे असलेले व १३८ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २८० जणांपैकी १९२ जणांमध्ये सौम्य, तर ७२ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १६ जण गंभीर आहेत. सध्या ४१३ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून, पाच जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT