Better planning of Chinchwad by-elections in less time Ajit Pawar appreciated office bearers and workers sakal
पिंपरी-चिंचवड

Ajit Pawar : चिंचवडच्या पोटनिवडणुकीचे कमी वेळेत उत्तम नियोजन; अजित पवार

अजित पवार यांच्याकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना नियोजनासाठी व प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. असे असतानाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्तम नियोजन केले.

पुढील निवडणुकीमध्ये आपला विजय नक्की असून खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक शुक्रवारी (ता. १०) केले..

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना लाखाच्या आसपास मते मिळाली. गतवेळच्या निवडणुकीपेक्षा तब्बल ६० हजार मते अधिकची खेचण्यात पक्षाच्या कायकर्त्यांना यश आले.

मात्र; अगदी थोड्या फरकाने यशाने हुलकावणी दिली. या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते व माजी नगरसेवकांनी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगसेवक संतोष कोकणे, विनोद नढे, शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार यांनी पोटनिवडणुकीत पडलेल्या मतांसह प्रभागनिहाय व बुथनिहाय माहिती यावेळी घेतली. यावेळी पवार म्हणाले की, पोटनिवडणुकीसाठी आपल्याला अत्यंत कमी वेळ मिळाला.

कमी वेळेतही निवडणुकीचे अत्यंत उत्तम नियोजन करण्यात व मोठी मते मिळविण्यात सर्वांच्या कष्टामुळे यश मिळाले. विजय-पराजय हे निवडणुकीत होतच असतात. मात्र, आपलेल्या मिळालेली मते ही आपली विश्वास द्विगुणीत करणारी आहेत. त्यामुळे खचून न जाता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत यश मिळविण्याच्या दृष्टीने आतापासून तयारीला लागा.

पुढील निवडणुकांमध्ये मतदार संधी देतील : पवार

अधिवेशन संपल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आपण बैठक घेणार असून त्यावेळी पुढील निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. आपण राज्य शासन, महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या कामाला आतापासूनच लागा. पुढील निवडणुकांमध्ये मतदार आपल्यालाच संधी देतील आणि आपला विजय होईल, असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखविल्याची माहिती नाना काटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Muncher Municipal Result:'मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे'; आमदार शरद सोनवणेंनी फुगडीतून व्यक्त केला आनंद..

राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष! एम.कॉम.चे शिक्षण घेणारी २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

Marathwada Sahitya Sammelan: ४५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ. म. शहाजिंदे; बीड जिल्ह्यात हाेणार संमेलन!

Nagaradhyaksha Election Poll Results : नगराध्यपदाच्या निकालानंतर अजित पवार गटाच्या नेत्याने टोचले स्वत:च्या पक्षाचे कान; म्हणाले, आत्मचिंतनाची गरज!

SCROLL FOR NEXT