mla-sticker 
पिंपरी-चिंचवड

शहरात फिरताहेत तब्बल डझनभर आमदार! 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी, चिंचवड व भोसरी या मतदारसंघाचे मिळून तीन आमदार आहेत. मात्र, "आमदार' असे स्टिकर लावलेल्या सुमारे डझनभर मोटारी फिरत आहेत. स्टिकर लावले आणि काचा वर केल्या की मोटारीत नेमके कोण आहे हे समजत नाही. शिवाय त्यांना प्रशासन व नागरिकांकडून सन्मान दिला जातो. तसेच रस्त्यावर कोठेही वाहने उभी केली तरी वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नाही. 

आमदार असे स्टिकर लावलेली तब्बल पाच वाहने फक्त चिखलीमध्ये आढळल्या आहेत. यामध्ये तीन इनोव्हा, एक फॉर्च्युनर व एक ऑडी गाडीचा आहे. काही वाहने भोसरी व इतर भागात आहेत. संपूर्ण शहरातील अशा "आमदारां'ची संख्या बारा होती. या पैकी तीन आमदारांच्या तीन गाड्या वगळल्या तर बाकी गाड्या कोणाच्या? याविषयी संभ्रम आहे. सर्वसामान्य माणसाने आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटवर काही लिहिले तरी वाहतूक विभागाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र, असे स्टिकर लावून फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिकांचा आहे. 

नियम सर्वसामान्यांसाठीच का? 
स्टिकरची एक गाडी तर क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षाची आहे. तळवडे वाहतूक पोलिस कारवाईसाठी उभे असलेल्या ठिकाणापासून अवघ्या दोनशे मीटरवर वाहने उभी असतात. कायदा, नियम हे केवळ सर्वसामान्य जनतेसाठीच असतात का? असा प्रश्न वाहनचालकांकडून विचारला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

SCROLL FOR NEXT