citizens are facing problems due to unclean water supply at padvalnagar in Thergao  
पिंपरी-चिंचवड

...म्हणून थेरगावात अशुद्ध पाणीपुरवठा; नागरिकांवर आली पाणी विकत घेण्याची वेळ

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मागील 2 आठवड्यांपासून थेरगावमधील पडवळनगर परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. रात्रीच्यावेळेस भांड्यांमध्ये पाणी भरुन ठेवले असता सकाळच्यावेळेस त्यामध्ये घाण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थेरगाव परिसरात महापालिकेच्या अमृत योजनेअंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. तेथील बऱ्याच गल्ल्यांमध्ये नळजोड घेण्यात आले आहेत. याच भागातील पडवळनगर येथे अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे स्थानिक नागरिक असउद्दीन बेग यांनी कळविले आहे. मात्र, पावसामुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे पालिकेचा पाणीपुरवठा विभाग म्हणत आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याचे जार विकत मागवावे लागत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

 पुण्यातल्या लॉकडाउनचं काय होणार? वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साबळे म्हणाले,""आमच्याकडे अजून कोणा नागरिकांची तक्रार आलेली नाही. महिन्याभरापूर्वी तक्रार होती. मात्र, तिचे निराकरण करण्यात आले आहे. नव्याने अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्यास त्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.'' 

आणखी वाचा - सिंहगडरोडवर हॉटेल चालकाचा खून

स्थानिक नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव परिसरातील नागरिकांचे अधिकृत नळजोड मिळण्याबाबतचे अर्ज पडून आहेत. त्यांना अद्याप पालिकेने नळजोड दिलेले नाहीत. रात्रीच्यावेळेस बेकायदेशीर नळजोड घेण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे, देखील अशुद्ध पाणीपुरवठा होत असावा.

सावधान : लोणी काळभोरमध्ये वाढताय कोरोना रुग्ण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT