Large quantity of fodder available for 52 thousand livestock in Maval taluka
Large quantity of fodder available for 52 thousand livestock in Maval taluka 
पिंपरी-चिंचवड

मावळ तालुक्यात डोंगर झाले हिरवेगार; जनवारांच्या चाऱ्याची चिंता मिटली

सकाळ वृत्तसेवा

बेबडओहोळ (पुणे) :  महिन्याभरापासुन ऊन आणि पाऊस यांची सांगड जमल्याने, यंदा गावठी चारा तालुक्यातील ५२ हजार पशुधनासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेली महिनाभरापासून ऊन व रिमझिम पाऊस तालुक्यात पडत आहे. यामुळे पवन मावळ, आंदर मावळ व नाणे मावळातील डोंगर भाग हिरवेगार झाला आहे. पाऊस हलक्या स्वरूपाचा स्वरूपात पडत असल्याने गवत वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. मावळ तालुका शेतीसाठी व भात पिकासाठी जिल्ह्यात सर्वांना परिचित आहे. मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस व येथील उपलब्ध चारा येथील पशुधनासाठी पाऊस संपल्यानंतरही उपलब्ध असतो. त्यामुळे तालुक्यातील पशुधनात येथील गावे नेहमीच अग्रेसर राहिली आहेत, माञ गेली सात वर्षात तालुक्यातील पशुधन जवळपास चार हजारांनी कमी झाले असले तरी जनावरांची संख्या पुन्हा वाढावी यासाठी पशुधन विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहे.

'जिल्हा स्वच्छता मिशन'चा एका रात्रीत खेळ खल्लास; राज्यातील स्वच्छता कक्ष इतिहासजमा होणार!​

यंदा पावसाने चांगेलीच उघडीप दिल्याने ऊन व रिमझिम पावसामुळे जवळपास १०० टक्के गावठी चारा ऊपलब्ध झाला आहे. चार महिने पुरेल इतका चारा गावातील भटके व पाळीव जनावरांसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यानंतर लागणाऱ्या वनव्यापासून चारा वाचवण्यासाठी प्रयत्नही करणे गरजेचे राहणार आहे. याबाबत शेतकरी उध्दव दौंड म्हणाले, ''पाऊस कमी झाला असला तरी डोंगरावरील गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.'' 

 मार्केटयार्डात भरदिवसा दिवाणजीला लुटले; वाचा चोरट्यांनी कसे लांबवले सव्वातीन लाख​

यंदाची पशुधन संख्या 
१) २०१७ पशुगनणेनुसार : ५६ हजार ११८
२)२०१९ पशुगनणेनुसार :५२ हजार ४२१
३) सुमारे ४ हजाराने पशुधन कमी झाले आहे. 

 
''सध्या गावठी चारा चांगल्या प्रमाणात उपलब्ध झाला असल्याने सध्या तरी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न रहाणार नाही.''
- दिपक राक्षे, तालुका पर्यवेक्षक अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT