पिंपरी-चिंचवड

आगामी निवडणुकांमध्ये वर्चस्व मिळविण्याचे राष्ट्रवादीचे लक्ष्य- प्रदीप गारटकर 

सकाळवृत्तसेवा

लोणावळा - ""आगामी 2021 मध्ये वर्ष ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुकांचे वर्ष आहे आणि या निवडणुकांमध्ये वर्चस्व मिळविणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लक्ष्य आहे,'' असा निर्धार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केला. 

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सर्व तालुकाध्यक्ष, फ्रंट, सेलचे जिल्हाध्यक्ष व सर्व युवक तालुकाध्यक्षयांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी गारटकर पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, युवती जिल्हाध्यक्षा पूजा बुट्टे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष करण कोकणे, सुभाष जाधव, लोणावळा शहर युवक अध्यक्ष सनी पाळेकर उपस्थित होते. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करणे, सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, निवडणुकांची पूर्वतयारी, पक्ष संघटना व फ्रंटल सेल कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्याबाबत आगामी काळात जिल्हास्तरीय पक्ष संघटनेचे उपक्रम, कार्यक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

सुळे, डॉ. कोल्हे करणार दौरा 
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सोमवार (ता.4) जानेवारी ते शुक्रवार (ता. 8) या पाच दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्र व जिल्ह्यात दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गारटकर यांनी दिली. 

पंधरा हजार कार्यकर्त्यांचे रक्तदान 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील पाच हजार युवक कार्यकर्त्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून पंधरा हजार जणांनी रक्तदानाचा हक्क बजावल्याचे घोटकुले यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT