Tree-Cutting 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्ष तोडीत पुढे, मात्र पुनर्रोपणात मागे

सकाळवृत्तसेवा

पाच वर्षात महापालिकेतर्फे 14 हजार झाडांची कत्तल 
पिंपरी - महापालिका झाडे तोडण्यात अग्रेसर असून, पुनर्रोपणात मात्र मागे आहे. कारण गेल्या पाच वर्षात महापालिकेच्या परवानगीने शहरातील तब्बल 14 हजार वृक्ष तोडले असून, केवळ सहा हजार 105 वृक्षांचे पुनर्रोपण झाले आहे. विनापरवाना झाडे तोडणाऱ्या 37 जणांवर खटले दाखल केले आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. परिणामी, शहरातील प्रदूषणात भर पडत असून, पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात एकूण भूभागापैकी 15.13 टक्के हरित क्षेत्र आहे. महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षांची लागवड केली जाते. त्यामध्ये अर्जुन, लेजोस्टोमिया, कडुनिंब, सोनचाफा, अशोका, सिसम, चिंच, जांभूळ, फणस, वड, पिंपळ, आकाशनीम, कदंबा, टबोबीया, मोहोगणी, पुत्रंजीवा, माड, मुचकद, बॉटल ब्रश, खाया, जाकरांडा, कॅशिया बहावा, सिल्वर ओक, रेनटी, कांचन, बकुळ अशा रोपांची लागवड केली जाते. प्रत्यक्षात त्यातील अत्यंत कमी झाडे जगतात. अनेक झाडे जळून जातात. 

कुजलेले, कीड लागलेले, जमिनीपासून मुळ्या सुटलेले, झाडांपासून जीवितास धोका निर्माण होत असल्यास, जीवित, वित्तहानी तसेच दुर्घटना होण्याची शक्‍यता असलेली झाडे धोकादायकमध्ये मोडली जातात. संबंधितांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर स्थळ पाहणी करून झाडांची धोकादायक झालेली वाढ, धोकादायकरीत्या वाढलेल्या फांद्या यांची छाटणी केली जाते, असा महापालिका उद्यान विभागाचा दावा आहे. 

अर्ज दिल्यानंतर 60 दिवसांत परवानगी 
संबंधित अर्जदाराचा अर्ज, झाडाचा फोटो, मालकी हक्काचा पुरावा, क्षेत्रफळाचा पुरावा प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियमानुसार झाडे तोडण्यास परवानगी दिली जाते. त्यासाठी जागेच्या क्षेत्रफळाप्रमाणे मानांकानुसार वृक्ष नसेल, तर मानांकाप्रमाणे एका वृक्षाला चार हजार रुपये यानुसार शुल्क भरावे लागते. अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून साठ दिवसात परवानगी दिली जाते. परवानगी न घेता झाडे तोडणाऱ्या 37 जणांवर महापालिकेने खटले दाखल केले आहेत.

वर्षनिहाय झाडे तोडण्यास, पुनर्रोपणास दिलेली परवानगी 
वर्ष.............झाड तोडणे.............पुनर्रोपण 

2015-16......1992...............1099 
2016-17.......1406...............778 
2017-18.......2400.............2119 
2018-19........3336............876 
2019-20........1334...........110 
2020...............1334...........123 
(नोव्हेंबर अखेर) 
एकूण...............14348.......6105

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT