plasma-therapy1.jpg 
पिंपरी-चिंचवड

बापरे ! पिंपरी-चिंचवडमध्ये सात दिवसांत वाढले 'एवढे' रुग्ण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या सात दिवसात म्हणजेच एक जुलैपासून तब्बल एक हजार 786 रुग्ण वाढले. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसाला सरासरी 250 रुग्ण आढळत आहेत. शहराच्या दृष्टिने ही चिंतेची बाब आहे. 

एक जुलै रोजी सकाळी सात वाजता शहरातील रुग्ण संख्या 3080 होती, तर 47 जणांचा मृत्यू झालेला होता. मंगळवारी सात जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 4871 (पॉझिटीव्ह) आणि 67 (मृत्यू) झाला होता. म्हणजेच गेल्या सात दिवसांत तब्बल 1786 रुग्णांची वाढ झाली असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. सरासरीचा विचार केल्यास दिवसाला 250 नवीन रुग्ण सापडत असून तीन जणांचा मृत्यू होत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महत्त्वाच्या गावानुसार रुग्णवाढीचा आढावा घेतला असता धक्कादायक माहिती समोर येते. शंभरपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावनिहाय (एक जुलै/सात जुलै/रुग्ण वाढ) रुग्णसंख्या दिलेली आहे. 

  • पिंपरी- 745/ 1105 /360 
  • चिंचवड- 617/816/199 
  • आकुर्डी- 242/366/124 
  • निगडी- 69/126/57 
  • भोसरी- 203/352/149 
  • दापोडी-198/256/58 
  • काळेवाडी- 121/179/58 
  • वाकड- 86/124/38 
  • थेरगाव- 75/114/39 
  • चिखली- 92/168/76 
  • जुनी सांगवी- 90/136/46 
  • पिंपळे गुरव- 73/124/51 

दहापेक्षा कमी रुग्ण असलेली गावे पुढील प्रमाणे आहेत. ताथवडे 2, पुनावळे 5, रावेत 8, फुगेवाडी 2, पिंपरी वाघेरे 5. यातील पुनावळे व फुगेवाडीतील रुग्ण बरे होऊन घरी गेले असून दोन्ही गावे कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, 11 ते 100 रुग्ण संख्या असलेले गावे : किवळे/29, मोशी/33, चऱ्होली/30, दिघी/51, बोपखेल/47, पिंपळे सौदागर/22, रहाटणी/15, कासारवाडी/49, तळवडे/12, नवी सांगवी/23, पिंपळे निलख/31. अन्य उपनगरांचा विचार केल्यास संभाजीनगर/14, रुपीनगर/47, यमुनानगर/16, ताम्हाणेवस्ती/13 व वाल्हेकरवाडी/15 अशी रुग्ण संख्या आहे. 

यामुळे वाढताहेत रुग्ण 
लॉकडाउन शिथिल झाल्यापासून शहरातील बाजारपेठा, मंडई, कंपन्या, कारखाने सुरू झाली आहेत. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क वाढला आहे. केवळ रुग्ण आढळलेल्या भागात अर्थात कंटेन्मेंट झोनमध्येच निर्बंध आहेत. पिंपरी कॅम्पसारख्या बाजारपेठेत फक्त पी1, पी2 पद्धतीने दुकाने सुरू आहेत. शिवाय, झोपडपट्टी, चाळी व दाट लोकवस्ती येथे सोशल डिस्टंसिंगचा अभाव दिसतो आहे. येथील घरांचा आकार लहान आहे. एकमेकाला घर लागून आहेत. रस्ते अतिशय निमुळते, अरुंद आहेत. रस्ते नव्हे तर बोळच आहेत. शिवाय, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर आहे. अनेक जण मास्क वापरताना दिसत नाहीत. यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसते आहे. 

प्रशासनाचे नियोजन... 
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर पाचशे रुपये व रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून दीडशे रुपये दंडाची कारवाई केली जात आहे. त्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. शिवाय, झोपडपट्टी, चाळींच्या भागात मास्क व साबनांचे वाटप केले आहे. पावसाळा असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना किमान दोन मास्क सोबत ठेवावेत, ओला मास्क वापरू नये. सार्वजनिक ठिकाणी व घरामध्येसुद्धा मास्क वापरावा, असे आवाहन वारंवार केले जात आहे. 

केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवले आहे. केवळ चिंचवड स्टेशन, पिंपरी कॅम्प- साई चौक- शगुन चौक, गांधी पेठ चाफेकर चौक चिंचवड, काळेवाडी मेनरोड (एम एम स्कूल ते काळेवाडी नदीवरील पुल), अजमेरा पिंपरी, मोशी चौक- मोशी आळंदीरोड, महाराणा प्रताप चौक- निगडी बसस्टॉप, डांगे चौक ते काळेवाडी फाटा, भोसरी आळंदीरोड, कावेरीनगर मार्केट, कस्तुरी मार्केट, थरमॅक्‍स चौक ते साने चौक, दिघी जकात नाका ते मॅगझीन चौक साईबाबा मंदिर या भागातील दुकाने सम-विषय तारखेनुसार खुली करण्यास परवानगी आहे. 

तपासणीची संख्या वाढली... 
पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील दहा लॅबमध्ये रुग्णांचे स्वॅब तपासणी केली जात आहे. यात एनआयव्ही, नारी, बीजे मेडिकल कॉलेज, वायसीएम, आयसर, बिर्ला हॉस्पिटल, कृष्णा डायग्नोस्टिक, वायरोप्ले, एसजी डायग्नोस्टिक, मेट्रोपोलिटीन डायग्नोस्टिक, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल या लॅबचा समावेश आहे. दिवसाला सरासरी 750 ते 800 रुग्णांचे स्वॅब तपासले जात आहेत. खासगी लॅबमध्ये स्वॅब तपासणीसाठी दोन हजार आठशे रुपये आकारले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT