pimpri-chinchwad-police-commissioner
pimpri-chinchwad-police-commissioner 
पिंपरी-चिंचवड

पोलिसांचे अवैध धंदे रोखणार कोण?

मंगेश पांडे

डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची शहरात जोरदार एन्ट्री झाली. पदभार स्वीकारताच अपेक्षेप्रमाणे अवैध धंद्यांना ‘लक्ष्य’ करीत जोरदार कारवाई सुरू केल्याने त्यांचा दबदबा निर्माण झाला. आयुक्तांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली असली तरी त्यांच्या पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेले अवैध प्रकार थोपविण्यास यश आलेले नाही. पिंपरी-चिंचवड पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या तीन घटना या आठवड्यात घडल्या. लाच स्वीकारण्यासह गुन्ह्यांचे कलम कमी करून आरोपींना मदत केल्याच्या प्रकारांमुळे अधिकाऱ्यांवर आता ‘पिंजऱ्यात’ उभे राहण्याची वेळ आली आहे.

आयुक्तालयांतर्गत औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, जागेला मोठा भाव आहे. यामुळे जमिनीसंदर्भातील तक्रारींचे प्रमाणही अधिक असते. यात अधिकारी अधिक रस दाखवायचे. या माध्यमातून अनेकांनी मोठी ‘माया’ जमविली. दरम्यान, आता जमिनीसंदर्भातील तक्रार आल्यास उपायुक्तांकडून पडताळणी करूनच पुढील कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे स्थानिक अधिकारी, कर्मचारीही काहीसे सावध झाले. यासह आयुक्तांनी अवैध धंद्यांना टार्गेट करीत हे धंदे कायमचे बंद करण्यासाठी मोहीम उघडली. सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून छापेमारी सुरू झाली. यामुळे या धंद्येवाल्यांसह स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. अनेक दिवस एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने खळबळ उडाली. आयुक्तांचे हे निर्णय स्वागतार्ह आहेत. मात्र, लाचखोर व चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जरब बसविण्यात अद्याप त्यांना यश आलेले दिसत नाही. 

आरोपींना पोलिसांची मदत
गंभीर गुन्ह्याचे कलम कमी करण्यासाठी पिंपरी ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे अर्ज सादर केल्याने आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली. यात पोलिसांनी आरोपींना एकप्रकारे मदत केली. दरम्यान, या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी पिंपरीचे निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे व उपनिरीक्षक एस. एस. जाधव यांना निलंबित केले. यासह सांगवी ठाण्यातील सहायक फौजदार शंकर एकनाथ जाधव यांना वीस हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. दिवाणी न्यायालयाने काढलेले ताबा वॉरंट बजावण्यासाठी तक्रारदाराला पोलिस बंदोबस्त पुरवण्यासाठी जाधव यांनी लाचेची मागणी केली. या प्रकरणात ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचेही नाव पुढे आले होते. मात्र, नंतर केवळ जाधव यांच्यावरच कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांच्या प्रतिमेचे काय?
पिंपरीतील साई चौकात वाहतूक पोलिस महिलेने दुचाकीचालक तरुणीकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तर दलाची प्रतिमा आणखी डागळली. स्वाती सोन्नर या कर्तव्यावर असताना दुचाकीवरील तरुणीने त्यांच्या खिशात पैसे ठेवले आणि त्यांनी ते स्वीकारल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. याप्रकरणी आयुक्तांनी सोन्नर यांना निलंबित केले. अवघ्या आठवड्याभरात या तीन घटना घडल्या आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असली तरी पोलिस दलाच्या डागळलेल्या प्रतिमेचे काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

ठोस पावले उचलायला हवीत
चोऱ्या, दरोडे रोखणारे पोलिसच अशाप्रकारे दरोडे टाकण्याचे उद्योग करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडूनही संताप व्यक्त होत आहे. पोलिस आयुक्तांनी ज्याप्रमाणे पोलिस पाल्यांना उद्योजक बनविण्यासाठी पावले उचलली, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले त्याप्रमाणेच पोलिस दलातील अशा प्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठीही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT