municipal-school-education 
पिंपरी-चिंचवड

पीसीएमसी स्कूल'ने विद्यार्थी 'लिंकअप',पिंपरी-चिंचवडमधील यादव गुरुजींचा पुढाकार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनामुळे शाळा शिक्षण बंद. मित्र-मैत्रिणींसोबत हसतखेळत शिक्षण घेण्याचा आनंद हिरावून घेतला. पण, आम्ही विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ नये किंबहुना भविष्यातील भविष्यवेधी शिक्षण घेण्यासाठी आमच्या दयानंद यादव गुरुजींनी विशेष प्रयत्न केला. ‘पीसीएमसी स्कूल’ नावाचा ब्लॉग तयार केला आणि आम्ही गरीब मुले ‘डिजिटल’ शिक्षण घेऊ लागलो. आता ब्लॉगच्या माध्यमातून महापालिका सोनवणेवस्ती शाळेतील प्रत्येक जण जोडल्याचे तिसरीतील बरसात सूर्यकांत तोरणगी सांगत होता. 

महापालिका शाळांमध्ये खासगी इंटरनॅशनल शाळांसारख्या आधुनिक सुविधा नाहीत. मात्र, यावर्षी नेमके ऑनलाइन शिक्षणाची सर्वांची गाठ पडली. त्यामुळे अनेक तंत्रस्नेहींनी आपापल्यास्तरावर प्रयोग केले. या प्रयोगांमधून शिक्षण ‘लिंकअप’ केले. असेच उपक्रमशिल शिक्षक यादव सांगतात, ‘‘या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण घेणे शक्‍य होईल का? ज्या मुलांना शाळेमध्ये एक वेळचे जेवण मिळते आणि शिक्षकांच्या जबाबदारीवरच पालक निश्‍चितच राहून मोलमजुरीला जातात. अशा पालकांचे काय होईल? असेच मनामध्ये विचारांचे वारे घुमू लागले. यावर पर्याय म्हणून ‘पीसीएमसी स्कूल’ नावाचा ब्लॉग सुरू केला. आजच्या घडीला २५ हजारांहून अधिक नागरिकांनी ब्लॉगला भेट दिली.’’ यादव गुरुजींनी प्राथमिक शिक्षण विभागाने हा ‘ब्लॉक’ सर्वत्र वापरण्यासाठी शिफारस केली आहे.

कसा तयार झाला ब्लॉग
गेल्यावर्षीच शाळेचा गुगल प्लेवर शाळेचा ॲप तयार केला होता. त्या ॲपवर दैनंदिन अभ्यास रोज विद्यार्थी घरी करायचे. पण आता फक्त माझा एकट्याचाच वर्ग नाही, तर पूर्ण शाळाही ‘ऑनलाइन’ करायची आहे. प्रत्येक मुलाची बहीण-भाऊ कोणत्या ना कोणत्या कत आहे. तेव्हा उमगले की, सर्व अभ्यासासंबंधीचे व्हिडिओ करणे, त्यात सर्व विषय-सर्व घटक. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर गोष्टी. विद्यार्थ्यांना व पालकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. व्यासपीठ मिळेल या हेतूने आपल्याला ऑनलाइनसाठी गुगलवर असे काही तयार करता येईल का? एका ठिकाणी सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कशा मिळतील. यासाठी खर्च कसा करायचा? आपल्याकडे तशी यंत्रणा आहे का?.मोफत काय करता येईल. जेणेकरून आपला हेतू साध्य होईल आणि मुलांनाही मोफत ऑनलाइन शिक्षण घेता येईल. या प्रेरणेतूनच ब्लॉग बनविण्याबाबत डोक्‍यात कल्पना सुचली. तेव्हा ब्लॉक कसा बनवायचा, त्यावर अभ्यास कसा अपलोड करायचा, याची माहिती मिळवून ‘पीसीएमसी स्कूल’ या नावाने ब्लॉग तयार करण्यात आला. गेल्या दहा महिन्यांपासून यावरच काम सुरू आहे.’’

शिक्षकांना ‘कोरोना ड्युटी’मुळे आमच्या मुलांचे हाल झाले. कंपन्या बंद असल्याने शाळेमधून राहण्याची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याची मदत मागितली. ती मिळाली देखील. यादव गुरुजींनी मुलांना ब्लॉग कसा वापरायाचा याची माहिती दिली. कधी-कधी घरी येऊन शिकवले. 
- सुहास गाडे, पालक सोनवणेवस्ती -चिखली

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT