Aamir Khan shares Sarfarosh memories 
Premier

25 years of Sarfarosh : आमिर खानला 25 वर्षानंतरही होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप; दिग्दर्शकाने केली पोलखोल

Aamir Khan shares Sarfarosh memories : सरफरोश सिनेमाला 25 वर्षं पूर्ण केली. यानिमित्त आमिर खानने काही खास आठवणी शेअर केल्या.

सकाळ डिजिटल टीम

आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या 'सरफरोश' सिनेमाला नुकतीच 25 वर्षं पूर्ण झाली. क्राईम थ्रिलर असलेला हा सिनेमा नव्वदच्या दशकात खूप गाजला. सुपरहिट झालेल्या या सिनेमात आमिरने मुंबई क्राईम ब्रांचमधील एसीपीची भूमिका साकारली होती.

भारतात दहशतवादाला प्रोत्साहन देणारे अतिरेकी आणि त्यांचा शोध घेणाऱ्या एसीपी अजय राठोडची भूमिका खूप गाजली. नुकतंच एका मुलाखतीमध्ये आमिरने त्याला या सिनेमातील एका गोष्टीविषयी अजूनही पश्चाताप होतो असं सांगितलं.

नुकतंच 'रेडिओ नशा' तर्फे सिनेमाच्या टीमचं रियुनियन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी सिनेमाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये आमिरने या सिनेमाशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी सांगताना तो म्हणाला कि,"या सिनेमाचं आजही अनेकजण कौतुक करतात. अनेक माझे आयपीएस मित्र मला येऊन सांगतात कि त्यांना हा सिनेमा खूप आवडतो. पण या सिनेमातील एका गोष्टीचा मला अजूनही पश्चाताप होतो तो म्हणजे मी या सिनेमासाठी माझे केस इतर पोलीस अधिकाऱ्यांसारखे बारीक कापू शकलो नाही. अजूनही ही गोष्ट माझं मन खाते. या सिनेमाचं शूटिंग सुरु असताना मी आणखी दोन सिनेमांचं शूटिंग करत होतो त्यामुळे मला केस कापता आले नाहीत पण आम्ही साधे कपडे घातले त्यामुळे ती गोष्ट लोकांच्या नजरेत आली नाही." मिस्टर परफेक्शनिस्टचं कामाबाबत असलेलं हे डेडिकेशन बघून सगळ्यांना त्याचा अभिमान वाटला.

आमिर ही गोष्ट शेअर करत असतानाच सिनेमाचे दिग्दर्शक जॉन यांनी याबाबतच एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते आमिरला केस कापण्याविषयी काहीच म्हणाले नाहीत कारण क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना ग्रूमिंगविषयी काहीही नियम नसतात हे उघड केलं. दिग्दर्शकाच्या या खुलास्याने आमिरला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो "उगाच मी इतकी वर्षं पश्चाताप करण्यात वाया घालवली" असं म्हणाला.

या सिनेमाच्या रियुनियला सिनेमाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. 1999 साली रिलीज झालेल्या या सिनेमाने 33.46 करोड कमावले होते.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT