Kapil Sharma Esakal
Premier

Kapil Sharma : "पप्पा तुम्ही म्हणालेलात..."; फोटोग्राफर्सना बघून कपिलच्या लेकीने केली तक्रार

अभिनेता कपिल शर्माच्या लेकीने पापाराझींना दिलेल्या रिअॅक्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सकाळ डिजिटल टीम

'द कपिल शर्मा' शोमुळे अभिनेता, सूत्रसंचालक कपिल शर्मा कायमच चर्चेत असतो. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा त्याचा ओटीटी शोही खूप गाजला. नुकतंच सोशल मीडियावरील कपिल आणि त्याच्या कुटूंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

कपिल त्याच्या संपूर्ण कुटूंबासोबत बाहेरगावी जात होता. त्यावेळी त्याच्या लेकीला फोटोग्राफर्सनी पाहिलं आणि तिने दिलेला रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

व्हिडिओमध्ये कपिल त्याच्या कुटुंबासमवेत मुंबई विमानतळावर आला तेव्हा. पापाराझींच्या घोळक्याने त्याला घेरलं. पापाराझी त्यांचे फोटो काढत असतानाच त्याची लेक अनायरा कपिलला म्हणाली, “बाबा तुम्ही बोलला होता की कोणीच आपले फोटो काढणार नाही.” (पापा आपने बोला था ये लोग फोटो क्लिक नहीं करेंगे)

तिचं हे बोलणं ऐकून कपिलसकट सगळे पापाराझी हसू लागले. त्यानंतर फोटोग्राफर्सना बघून अनायरा थोडी रडायलाही लागली.

सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ आवडला आणि सगळ्यांनी पापाराझींना अनायराचा सल्ला ऐकण्याचा सल्ला दिला. तर अनेकांनी मुलांची प्रायव्हसी जपा, त्यांचं म्हणणं ऐका असं सांगितलं. तर एकाने मुलं एकदम खरं बोलतात असं म्हंटलं.

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथने १२ डिसेंबर २०१८ मध्ये जालंधरला लग्न केलं. लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांनी डिसेंबर २०१९ मध्ये अनायराच्या जन्माची गुड न्यूज दिली. तर २०२१मध्ये मुलाचा जन्म झाला त्याचं नाव त्रिशान असं ठेवलंय.

लवकरच येणार 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीजन

दरम्यान, कपिलचा गाजलेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा पहिला सीजन पार पडला. आता लवकरच या शोचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या शोच्या निमित्ताने सुनील ग्रोव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर आणि अर्चना पुरन सिंह बऱ्याच काळाने एकत्र आले. या शोचा पहिला सीजन खूप गाजला.

या शोमध्ये विकी आणि सनी कौशल, रणबीर कपूर आणि नीतू कपूर, सनी देओल आणि बॉबी देओल तसंच आमिर खान यांनी हजेरी लावली होती.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT