Premier

Aai Kuthe Kay Karate: 'आई कुठे काय करते'च्या प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, संजनाची बाजू घेत प्रेक्षकांचा मेकर्सना प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते (aai kuthe ky karate)ही लोकप्रिय मालिका. मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स कायमच चर्चेत असतात. मालिकेत आशुतोषचं निधन झाल्यावर अरुंधती देशमुखांच्या घरी परत राहायला आलीये. तिचं परत येणं संजनाला आवडलेलं नाहीये. त्यातच मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

नुकताच स्टार प्रवाहाच्या सोशल मीडियावर मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला. यात संजना अरुंधतीला "तुझं इथे राहण्याचं खरं कारण मला माहितीये" असं म्हणते. त्यावर अरुंधती "मला माझा संसारच वाचवायचा असता तर मी तुला कधी अनिरुद्धच्या आयुष्यात येऊच दिलं नसतं." असं उत्तर देते. ( star pravah)

त्याने संजनाला धक्का बसतो. अरुंधती तिला "संजना तुला आत्मपरीक्षणाची गरज आहे. तुला तुझा संसार सुखी करायचा असे तर तुझ्यात काय बदल करायला पाहिजेत याचा विचार केलास तर सुखी होशील." असा सल्ला देते. तिच्या या सल्ल्याने संजना विचारात पडते. असं प्रोमोमध्ये पाहायला मिळालं.

पहा व्हिडीओ:

मालिकेचा हा भाग बुधवार १० एप्रिल २०२४ ला दुपारी २:३० वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी टीका केली, तर काहींनी प्रोमो आवडल्याचं म्हंटलं.(marathi daily show Latest News)

'संसार वाचवण्यासाठी संजनानेच का बदल करावा?आणि तो ही अनिरुद्ध सारख्या लंपट आणि स्वार्थी माणसासाठी ...त्याचात कधी बदल करणार ??? संसार फक्त बायकांनीच वाचवायचा असतो का ???' अशी कमेंट एका युजरने केली तर एकाने 'लोकं कमेंट मध्ये एवढे निगेटिव्ह रिव्यू देतायत, दुपारी अडीच च्या स्लॉट मध्ये फेकून टी आर पी चा मोये मोये झालंय, तरी दिग्दर्शक आणि लेखकांच्या वागण्यात परिणाम दिसतोय का??' असा प्रश्न विचारला. (marathi serial News Update )

गेल्या काही महिन्यांपासून मालिकेतील होणाऱ्या बदलांवरून प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत तक्रार करत आहेत. पण याबाबत मालिकेच्या टीमकडून किंवा चॅनलने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाहीये. त्यातच मालिकेचा टीआरपी घसरल्याने आता दुपारी २:३० वाजता ही मालिका प्रसारित होतेय. पण अजूनही काही प्रेक्षकवर्ग अजूनही ही मालिका आवर्जून बघतो. (aai kuthe ky karate Serial Latest update)

अरुंधती देशमुखांचं घर सोडणार का संजनाचे अरुंधतीविषयीचे गैरसमज दूर होतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या पुढील भागात मिळतील. पाहत राहा आई कुठे काय करत सोमवार ते शनिवार दुपारी २:३० फक्त स्टार प्रवाहवर.(marathi Serials on Star Paravah)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मोठी बातमी! हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: राजेश पाटलांनी केले मतदान

SCROLL FOR NEXT