alyad palyad 2 poster Esakal
Premier

Alyad Palyad Movie : पुन्हा येतोय 'अल्याड पल्याड' ; सिनेमाच्या निर्मात्यांनी केली सिक्वेलची घोषणा

Alyad Palyad 2 Movie Announcement : गौरव मोरे आणि सक्षम कुलकर्णी यांचा गाजलेला अल्याड पल्याड सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Alyad Palyad 2 : गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी आणि मकरंद देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेल्या अल्याड पल्याड या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. हॉरर कॉमेडी प्रकारात मोडणारा हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला. प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करून सिनेमाचे निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर यांनी 'अल्याड पल्याड 2' हा सिक्वेलची घोषणा केली. जून 2025 मध्ये अल्याड पल्याडचा सिक्वेल सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

सिनेमाचं पोस्टर

सोशल मीडियावर अल्याड पल्याड २ चं पोस्टर रिलीज करत ही घोषणा करण्यात आली. या पोस्टरवर एक बंद दरवाजाची अंधुक झलक दिसत असून त्यावर लावलेलं विचित्र टाळं लक्ष वेधून घेतंय. या पोस्टरला अल्याड पल्याड २ येतोय...असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

निर्मात्यांनी केलेल्या घोषणेनुसार पुन्हा एकदा तिचं कास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. पण यावेळी त्यांच्यापुढे काय आव्हान असणार ? सिनेमाचं कथानक नेमकं काय असेल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल.

अल्याड पल्याडचं कथानक

'अल्याड पल्याड’ चित्रपट हा एका नदीनं वेढलेल्या ओरस नावाच्या गावावर आधारित आहे. ज्यात पूर्वजांच्या कर्माचे भोग, म्हणून गावातील सर्व सजीव दरवर्षी तीन दिवस वेशीबाहेर अर्थात नदीच्या पल्याड जातात.. या तीन दिवसादरम्यान गावात भुताचा वावर असल्याचं बोललं जातं.. याच परंपरेच्या आधारावर हा चित्रपट काढण्यात आला आहे. ज्यात शहरातून तीन मित्र गावी येतात आणि भुताचं अस्तित्व अमान्य करत गावात न जाण्याची ताकीद असतानाही ते गुपचूप गावात शिरतात. गावात जाताना त्यांच्या मागावर एक मुलगी निधी असते. पुढे नेमकं काय घडतं यावर हा सिनेमा भाष्य करतो.

सिनेमाची कास्ट

अल्याड पल्याड सिनेमाच्या पहिल्या भागात मकरंद देशपांडे, संदीप पाठक, गौरव मोरे, अनुष्का पिंपुटकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. प्रीतम एस के पाटील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला आणि पहिल्याच आठवड्यात सिनेमाने कोट्यवधींचा गल्ला जमवला. मकरंद देशपांडे आणि संदीप पाठक यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जो रूटने वाढवली भारताची चिंता! अनपेक्षित पाहुण्यांमुळे सारेच हैराण, पहिल्या दिवशी इंग्लंडचे वर्चस्व

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

Radhika Yadav: 'तो' वाद अन्...; टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी का संपवलं? पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

Navi Mumbai News: पनवेलचा पाणी प्रश्न सुटण्यास २०२६ उजाडणार, न्हावा-शेवा टप्पा-३ प्रकल्‍पास विलंब!

IND vs ENG 3rd Test: कंटाळवाण्या कसोटीत तुमचं स्वागत! शुभमन गिल अन् मोहम्मद सिराज ऑन फायर, स्लेजिंगचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT