Deepika Padukone's Special Post Esakal
Premier

Ranveer Singh Birthday : "बाळाला पार्टी करायचीय...", रणवीर सिंहला वाढदिवसाला दीपिकाकडून मिळालं खास सरप्राईज

Deepika Give Special Surprise To Her Husband : अभिनेत्री दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत तिच्या नवऱ्याला वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज दिलं.

सकाळ डिजिटल टीम

Deepika Padukon & Ranveer Singh : बॉलीवुडचा एनर्जेटीक स्टार रणवीर सिंह त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोशल मिडीयावर चाहत्यांनी देखील रणवीर सिंहला खास शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र रणवीर सिंहला पत्नी दीपिका पादुकोण कडून खास सरप्राईज मिळालंय.

सध्या दीपिका पदुकोण ही विविध कारणांमुळे चर्चेत आहे. त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे दीपिकाची प्रेग्नेन्सी. दीपिकाचे प्रेग्नेंट बेबी बंप लुक सध्या चर्चेत आहेत. शिवाय 'कल्कि २८९८ एडी' या चित्रपटामधील कामामुळे देखील दीपिका चर्चेत आहे. यातच दीपिकाने पती रणवीर सिंहला त्याच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट दिलंय.

नुकतच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलीवुडच्या अनेक कलाकारांनी आणि दिग्गजांनी हजेरी लावली होती. या खास कार्यक्रमात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह देखील उपस्थित होते. या खास सोहळ्यासाठी दीपिकाचा कमाल लुक पाहायला मिळाला. जांभळ्या रंगाची साडी आणि बेबी बंप अशा लुकमध्ये दीपिका यावेळी दिसली. या लुकचे फोटो तिने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या लुकला चाहत्यांचीही पसंती मोठ्या प्रमाणात मिळालीय. सोशल मिडीयावरील या फोटो पोस्टसाठी दीपिकाने गमतीशीर कॅप्शन देखील लिहीलं आहे. ती लिहीते की, "असंच...कारण ही शुक्रवारची रात्र आहे आणि बाळाला पार्टी करण्याची इच्छा आहे."

दीपिकाचे हे फोटो रणवीर सिंहला मात्र प्रचंड आवडले आहेत. म्हणूनच त्याने या फोटोंवर खास रोमँटिक कमेंट देखील केली आहे. रणवीर या कमेंटमध्ये लिहीतो की, "हाये.. माझं सुंदर बर्थडे गिफ्ट, आय लव्ह यू". दीपिकाचे हे सुंदर फोटो पाहुनच रणवीर इतका आनंदी झालाय की त्याला त्याचं बर्थडे गिफ्ट मिळाल्याचाच जणू आनंद झालाय. दीपिकाची ही पोस्ट म्हणजेच रणवीरचं बर्थडे गिफ्ट असल्याचं यावेळी दिसलं. शिवाय येणाऱ्या पाहुणा किंवा पाहुणीसाठी रणवीर किती उत्सुक आणि आनंदी असल्याचं दिसतय.

Ranveer Comment On Deepika's Post

रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. आता या दोघांसोबत आणि एक पाहुण्याच्या एन्ट्रीने लवकरच हा परिवार पूर्ण होताना दिसणार आहे.

रणवीर सिंहने २०१० 'बँड बाजा बारात' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याच्या हटके अभिनयकौशल्याने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. एका पाठोपाठ एक उत्तम भूमिका सादर करत तो बॉलीवुडचा स्टार बनला. 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये रणवीर - दीपिका एकत्र झळकले आणि प्रेक्षकांनाही ही जोडी चांगलीच पसंत पडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Caste Certificate: नव्या जीआर नुसार कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवाल? आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया जाणून घ्या, 'असे' तपासा पुरावे...

Cabinet Decision: पुणे मेट्रोच्या दोन मार्गिकांचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीतील सर्व निर्णय वाचा एका क्लिकवर

Latest Maharashtra News Updates : आम्हालाही हैदराबाद गॅझेटिअर लागू करावा; बंजारा ब्रिगेडचे रविकांत राठोड यांची मागणी

Stock Market Closing: शेवटच्या तासात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 409 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

Crime News : तीन वर्षांपूर्वी मित्राच्या बायकोवर जडला जीव...नैनिताल ट्रीपवर पतीला आला संशय....बायकोसह भाजप नेत्याची केली निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT