Anupamaa Esakal
Premier

Anupama : 'अनुपमा' मधील अनुजची ही काय झाली अवस्था ! ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Anupama Fame Gaurav Khanna's Photos Went Viral : अनुपमा फेम अभिनेता गौरव खन्नाचे विमनस्क अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Gaurav Khanna : स्टार प्लसवर सुरु असणारी अनुपमा (Anupamaa) ही मालिका खूप लोकप्रिय आहे. अनुपमा या कर्तृत्ववान स्त्रीची गोष्ट सांगणाऱ्या मालिकेने गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. या मालिकेतील अनुज आणि अनुपमाची लव्हस्टोरी, त्यात येणारे ट्विस्ट अँड टर्न्स पाहणं प्रेक्षक एन्जॉय करतात पण सध्या मालिकेत अनुजची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता गौरव खन्नाचे (Gaurav Khanna) विचित्र अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गौरवचे फोटो चर्चेत

सोशल मीडियावर गौरवचा विमनस्क अवस्थेतील फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये गौरवचे केस आणि दाढी वाढली असून त्याने अंगावर मळकट कपडे घातल्याचं दिसत आहे. त्याच्या या फोटोवरून त्याला मानसिक धक्का बसला असावा असं जाणवत आहे. त्याच्या या फोटोमुळे अनेक फॅन्सना धक्का बसला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालिकेत येणाऱ्या आगामी ट्विस्ट्ससाठी गौरवचा हा लूक करण्यात आला आहे. पण मालिकेत असा काय नवीन ट्विस्ट येणार आहे असा प्रश्नही मालिकेच्या चाहत्यांना पडला आहे. त्याचा हा लूक का असावा याविषयी चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत.

नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

मालिकेत आता पुन्हा अनुज आणि अनुपमामध्ये दुरावा येणार असल्याच्या चर्चा आहेत. अनुपमा पुन्हा अनुजला सोडून जाणार आहे किंवा अनुपमा बेपत्ता होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पण याबाबत मालिकेच्या मेकर्सनी कोणतीही पुष्टी दिली नाहीये. काहींनी तर मालिकेच्या कथानकावर टीका केली आहे तर काहीजण मालिकेत येणाऱ्या या ट्विस्टबाबत उत्सुक आहेत.

मालिकेत सुरु असणारं कथानक

सध्या या मालिकेत नवीन कथानक पाहायला मिळत आहे. डिंपलने टिटू नावाच्या मुळाशी लग्न केलं असून या लग्नाला वनराजचा विरोध आहे तर अनुजने त्याच्या प्रेमाची कबुली अनुपमाकडे दिली आहे. तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मालिकेत आता अनुपमाचा मृत्यू दाखवण्यात येणार असल्याचं म्हंटलं जातंय. या घटनेचा धक्का अनुजला बसणार असून त्याची मानसिक अवस्था बिघडणार असल्याचं म्हंटलं जातंय तर मालिकेच्या कथानकामध्येही काही वर्षांचा लीप येणार असल्याची चर्चा आहे.

रुपाली गांगुली मालिका सोडणार ?

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री रुपाली गांगुलीने (Rupali Ganguly) भाजपा पक्षात प्रवेश केला. तिच्या राजकारणातील प्रवेशामुळे रुपाली आता मालिका सोडणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली असून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण अद्याप अभिनेत्रीने दिलं नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : कात्रज उद्यानातील ऑनलाईन बुकिंगला प्रतिसाद; दोन वर्षांत ५ लाख ४४ हजार ६३ पर्यटकांकडून ऑनलाईन बुकिंग!

Oral Cancer Risk Prediction: जनुकांद्वारे समजेल कुणाला तोंडाच्या कर्करोगाचा धाेका; टाटा मेमोरियल सेंटर व ‘अ‍ॅक्ट्रेक’चे संशोधन

Khadakwasla Theft : खडकवासला सोसायटीतील चार बंद सदनिका फोडल्या; ४ अज्ञात चोरट्यांकडून सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास!

Municipal Employee Pay : समाविष्ट गावांतील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात आणि पदावनती; आयुक्तांनी पुनर्विचार आदेश दिला!

Latest Marathi News Live Update : नंदुरबार येथील मतदान केंद्रांवर दोन गटात राडा

SCROLL FOR NEXT