Mirzapur Season 3 sakal
Premier

Mirzapur Season 3: प्रतीक्षा संपली! 'मिर्झापूर 3'ची रिलीज डेट जाहीर, कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज? जाणून घ्या

Mirzapur Season 3 to premiere on July 5: मिर्झापूर-3 ही वेब सीरिज प्राईम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

priyanka kulkarni

Mirzapur 3: सत्तेसाठी लढाई आणि छल कपट याचं मिश्रण असलेल्या मिर्झापूर या वेब सीरिजच्या दोन सीझन्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिर्झापूर-3 (Mirzapur 3) या वेब सीरिजची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. अशातच आता या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

कधी आणि कुठे रिलीज होणार 'मिर्झापूर-3'?

मिर्झापूर-3 ही वेब सीरिज प्राईम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मिर्झापूरचे आधीचे दोन सीझन्स देखील प्राईम व्हिडीओ रिलीज झाले होते. आता प्राईम व्हिडीओच्या ट्विटर (X) अकाऊंटवरुन मिर्झापूर-3 या वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. प्राईम व्हिडीओनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे, "कर दिए प्रबंध मिर्झापूर-3 का, डेट नोट कर लीजिये, 5 जुलाई"

'मिर्झापूर'ची स्टार कास्ट

मिर्झापूर या वेब सीरिजचं दिग्दर्शन गुरमीत सिंह आणि आनंद अय्यर यांनी केलं आहे. या वेब सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फज़ल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, विजय वर्मा, ईशा तलवार, अंजुम शर्मा, प्रियांशु पेन्युली, हर्षिता शेखर गौड़, राजेश तैलंग, शीबा चड्ढा, मेघना मलिक आणि मनु ऋषि चड्ढा यांनी काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest: नेपाळ हिंसाचारामागील खरा सूत्रधार कोण? प्रसिद्ध रॅपर आणि राजकीय नेत्याचं नाव समोर, हा नेमका आहे तरी कोण?

MS Dhoni करतोय बॉलीवूड पदार्पण? माधवनसोबतचा जबरदस्त ऍक्शन पॅक टीझर आला समोर

Congress and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेसने निर्माण केला पेच? विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर ठोकला दावा!

St Bus Bike Accident : एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, मृतदेह छिन्नविछिन्न

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT