Premier

Kartiki Gaikwad : कार्तिकी-रोनितला पुत्ररत्न ; सोशल मीडियावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

Singer Kartiki Gaikwad Blessed with baby boy : गायिका कार्तिकी गायकवाडने मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने आई झाल्याची घोषणा केली.

सकाळ डिजिटल टीम

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम गायिका कार्तिकी गायकवाड आई झाली. कार्तिकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. कार्तिकी आणि रोनितचं त्यांच्या सगळ्या चाहत्यांनी अभिनंदन केलं.

कार्तिकी आणि रोनितने सोशल मीडियावर आज पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लहान मुलाचे हात दिसत असून त्याला "माझ्या बोटामध्ये कोणतीही गोष्ट एवढी कधीच परफेक्ट पकडली नव्हती किंवा शोभली नव्हती जितकं माझ्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचा हात आहे." असं कॅप्शन दिलं आहे. कार्तिकीच्या पोस्टनंतर तिच्या नवऱ्याने आणि नातलगांनीही पोस्ट शेअर करत त्यांचा आनंद व्यक्त केला.

काहीच दिवसांपूर्वी कार्तिकीचा ओटीभरणाचा कार्यक्रम थाटात पार पडला. सोशल मीडियावर तिने शेअर केलेले फोटो, व्हिडीओ बरेच चर्चेत होते. हिरव्या रंगाची साडी नेसून, फुलांच्या दागिन्यांमध्ये नटलेली कार्तिकी मोहक दिसत होती. कार्तिकीची मैत्रीण आणि गायिका मुग्धा वैशंपायननेही सोशल मीडियावर कमेंट करत तिचं आणि रोनितचं अभिनंदन केलं होतं.

तिने बराच काळ तिची प्रेग्नेंसीची बातमी लपवून ठेवली होती त्यामुळे सोशल मीडियावर कार्तिकीने डोहाळजेवणाचे फोटो शेअर केल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला होता.

माधुरी खेसे या मेकअप आर्टिस्टने कार्तिकीच्या ओटीभरणाचा कार्यक्रमाचा vlog सोशल मीडियावर शेअर केला होता. यात कार्तिकी म्हणाली होती कि,"मुलगा हवा की मुलगी याबद्दल मी अजून काहीही विचार केलेला नाही. मुलगा किंवा मुलगी जे कोणी होईल त्या बाळाचं आरोग्य उत्तम असूदेत.मुलगा होणार की मुलगी यापेक्षा बाळ जर गाण्याच्या क्षेत्रात आलं तर मला जास्त आनंद होईल. पण बाळाची आवड महत्त्वाची असेल. त्याच्यावर कोणतीही गोष्ट लादणार नाही."

2020मध्ये कार्तिकी रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. रोनितचं कुटूंब पुण्यातील असून त्यांचा बिझनेस आहे. रोनित स्वतःसुद्धा शेअर मार्केटमध्ये काम करतो. तर कार्तिकीनेही अनेक गाणी गायली आहेत. याशिवाय ती झी मराठीवरील अवघा रंग एक झाला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या 2021मधील पर्वामध्ये परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली होती.

Andhra Pradesh Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशमध्ये धावत्या बसने अचानक कसा घेतला पेट? पहाटे ३ च्या सुमारास नेमकं काय घडलं? वाचा...

राजकीय हाराकिरी

भाऊबीजेच्या दिवशी दुर्दैवी घटना! मुलाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आईला हृदयविकाराचा झटका; बहिणीनं भावाचं औक्षण करत दिला निरोप

Prakash Mahajan: मुंडे कुटुंबाचा वारस जाहीर करण्याचा अधिकार भुजबळांना नाही : प्रकाश महाजन

Stock Market Opening: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी घसरले, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT