Sonakshi Sinha Pregnancy  Esakal
Premier

Sonakshi Sinha : प्रेग्नेंसीच्या चर्चांवर अखेर सोनाक्षीने सोडलं मौन ; म्हणाली,"लग्न झाल्यावर..."

Sonakshi Sinha Pregnancy Rumors : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतर ती प्रेग्नेंट असल्याच्या सुरु असलेल्या अफवांबद्दल अखेरीस मौन सोडलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sonakshi Sinha Pregnancy : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. झहीर इकबालशी तिने केलेल्या सरप्राईज वेडिंगनंतर तिचा हॉस्पिटलमध्ये जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हिडीओमुळे ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सगळीकडे रंगू लागल्या. प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोनाक्षीने अखेर मौन सोडलं.

काय म्हणाली सोनाक्षी ?

लग्नानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच सोनाक्षी आणि झहीरचा हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे सोनाक्षी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सगळीकडे रंगू लागल्या. या चर्चांवर उत्तर देताना सोनाक्षी टाईम्स नाऊ या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाली,"मी इतकंच म्हणेन कि आता आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही. कारण जसं आम्ही हॉस्पिटलमध्ये जाताना दिसू तर सगळ्यांना हेच वाटेल कि, मी प्रेग्नेंट आहे. हे आमच्या लग्नानंतर बदललं आहे. मी पुन्हा काम सुरु केलंय याचा मला आनंद होतोय."

तर लग्नानंतर त्यांच्या आयुष्याविषयी काय बोलताना ती म्हणाली कि,"नमला लग्नानंतरही सगळं आधीसारखंच वाटतंय हीच यातील चांगली गोष्ट आहे. माझं आयुष्य लग्नापूर्वी खूप स्थिर होतं आणि आता लग्नानंतर पुन्हा मी त्यातच व्यस्त आहे. "

सोनाक्षीचा 'काकुडा' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. १२ जुलै २०२४ ला झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होणार असून रितेश देशमुख आणि साकिब सलीम यांच्या मुख्य भूमिका आहे. याशिवाय ती हिरामंडी च्या दुसऱ्या पार्टमध्येही ती दिसणार असल्याची चर्चा आहे.

सोनाक्षीला मिळणार नाही सिन्हा कुटूंबाची संपत्ती

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात त्यांनी म्हंटलं आहे कि,सोनाक्षीला सिन्हा कुटूंबाच्या संपत्तीतील काहीही हिस्सा मिळणार नाही. याच स्पष्टीकरण देताना ते म्हणाले कि,"मी माझ्या मुलीला काहीही देणार नाही. माझी मुलगी आता स्वावलंबी आहे आणि चांगली कमाई करते. तिला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि मला तिचा अभिमान आहे. शिवाय माझ्या मुलीने स्पष्ट सांगितलंय की तिला माझ्याकडून कशाचीही गरज नाही आणि मला तिच्या या विश्वासाचा अभिमान आहे. आजपर्यंत तिने जे काही मिळवलंय, ते तिने स्वत:च्या बळावर केलंय आणि ती सदैव आनंदी राहो हीच मी प्रार्थना करतो."

सोनाक्षी आणि शत्रुघ्न यांनी घेतलेल्या या निर्णयाचं सध्या खूप कौतुक होतंय. सोनाक्षीच्या लग्नात सिन्हा कुटूंब आनंदाने सहभागी झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway: पश्चिम रेल्वेकडून गुडन्यूज! दिवाळी-छठपूजेसाठी विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक

PMC Bonus Scam : सुरक्षा रक्षकांना ना बोनस ना वेतन, ऐन दिवाळीत कर्मचारी हवालदिल; ठेकेदार महापालिकेला देईना दाद

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणाच्याही प्रवासावर कोणतेही बंधन नाही - राम कदम

Dhaka Airport Fire Video : ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग ; सर्व विमानांचे लँडिंग अन् टेकऑफ तातडीने थांबवले गेले!

New Year Horoscope Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी ! 2026 मध्ये 'या' 5 राशी होणार मालामाल

SCROLL FOR NEXT