Zara Hatke Zara Bachke sakal
Premier

Zara Hatke Zara Bachke: 11 महिन्यानंतर ओटीटीवर रिलीज होणार 'जरा हटके जरा बचके'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Sara Ali Khan And Vicky Kaushal Movie: 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

Zara Hatke Zara Bachke OTT Release Date: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची अनेकजण वाट बघत होते. अशातच आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबद्दल जाणून घेऊयात...

कधी रिलीज होणार 'जरा हटके जरा बचके' चित्रपट?

जरा हटके जरा बचके हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट 2 जून 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि सारा अली खान यांनी पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली आहे. थिएटर रिलीजनंतर 11 महिन्यांनी जरा हटके जरा बचके हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.

जरा हटके जरा बचके हा चित्रपट 17 मे रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. जिओ सिनेमाच्या इंस्टाग्राम पेजवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले, "सह-परिवार शादी की थी, अब सह-परिवार घटस्फोट भी होगा! तो आप सब तलाक में जरूर आना! जरा हटके जरा बचके 17 मे पासून JioCinema Premium वर स्ट्रिम होत आहे."

'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात इंदूरमध्ये राहणाऱ्या एका विवाहित जोडप्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे . लग्नानंतर ते कुटुंबासोबत राहतात त्यामुळे त्यांना घरात प्रायव्हन्सी मिळत नाही. त्यासाठी ते खूप स्ट्रगल करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT