bullying in school
bullying in school esakal
प्रीमियम महाराष्ट्र

४-५ मुलं एका दुबळ्या मुलाला बेंचवर झोपवतात आणि..

Shraddha Kolekar

मुंबई : पुण्यातील नावाजलेली आणि प्रतिष्ठित शाळा... सातवीच्या वर्गातील ४-५ मुलं एका दुबळ्या मुलाला बेंचवर झोपवून आक्षेपार्ह वर्तन करतात.. ‘ए तू मुलगी आहे’ असं म्हणत पँट खेचण्याचा प्रयत्न करतात...

शाळा सुटल्यावर मुलगा आईला घडलेला प्रकार सांगतो आणि पुढे हे सगळं प्रकरण समुपदेशनापर्यंत पोहोचते... हे सगळं भोगणारा मुलगा आजही बाथरूमममध्ये जाऊन दोन दोन तास बसतोय, मी मुलगा आहे का असा प्रश्न त्याला पडतोय...

सोशल मीडियावरील एका पोस्टमधून ही घटना चर्चेत आली आणि किशोरवयातील बुलिंग हा मुद्दा चर्चेत आला.

वर्गातील भांडणे Instagram वर!

दुसऱ्या एका घटनेत पुण्यातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित शाळेतल्या एक शिक्षिका सांगत होत्या.. माझ्या वर्गातील मुलांनी वर्गात भांडणे केली ती शूट केली आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केली.. हा सगळा प्रकार थ्रील म्हणून केला..

बरं ही आठवी नववीतील मुलं. पण मुलांच्या दप्तरात मोबाइल आलेच कुठून? या सगळ्याचे उगमस्थान कुठे आहे? असा प्रश्न प्रत्येक पालकांना देखील पडायला हवा..

या एकूणच विषयाबाबत मानसोपचारतज्ज्ञ स्वप्नील पांगे यांच्याशी संवाद साधला असता या घटना कश्या हातळल्या जाव्यात या विषयी त्यांनी सांगितले.

(Pune School news)

बुलिंग म्हणजे काय? (What is bullying?)

बुलिंगच्या घटना हल्ली सगळीकडेच घडताना दिसतात. कामाच्या ठिकाणी देखील बुलिंग होतं पण ते मुलांच्या बुलिंगप्रमाणे नसतं. म्हणजे त्यात मारामारी नसते.

मुलांचं बुलिंग म्हणजे एखाद्याला दरडावणे, चिडवणे, घाबरवणे, अश्लील शब्द वापरणं, अश्लील हावभाव करणं, शिव्या देणं असे बुलिंगचे प्रकार येतात.

या सगळ्या गोष्टी मोबाईलमुळेच होत आहेत असा सहज अनुमान लावला जातो. पण मोबाईल नसतानाही अशा घटना घडतच होत्या.

पालक " इतना मजाक तो चलता है" असा दृष्टिकोन

कोणीतरी मुलांना सातत्याने चिडवत असेल, त्रास देत असेल तर पालक मुलांनाच तू लक्ष देऊ नको, लांब बस, बाईंना सांग असे सल्ले देतात. किंवा अनेकदा काही ठिकाणी जेव्हा बुलिंगचे प्रकार घडतात तेव्हा " इतना मजाक तो चलता है" अशा प्रकारच्या मानसिकतेतून त्याकडे पाहिलं जातं.

पालक फार गांभीर्याने या प्रकारांकडे बघत नाहीत. मुलांना सांगितलं जातं की, ठीके एवढं काय त्यात? तुला थोडंसं चिडवलेलं पण सहन होत नाही का?

मुलं जेव्हा तुम्हाला स्वतःहून काही गोष्टी सांगतात तेव्हा त्याची शहानिशा व्हायला हवी. हे बुलिंग नेमकं कोणत्या प्रकारात होतंय याची माहिती घ्यायला हवी.

तुमची मुलं कोणत्या प्रकारची मस्ती करतात?

मुलं काय मस्ती करणारच.. चालयचं. असा अप्रोच शिक्षकांचा असतो. कारण मुळातच शिक्षकांकडे अशा खूप तक्रारी येत असतात आणि जोपर्यंत काही गंभीर घटना होत नाही तोपर्यंत ते याकडे शुल्लक गोष्ट म्हणून बघत असतात.

परंतु मुलं मस्ती करतायेत म्हणजे काय करतायेत? एकमेकांना चिडवतायेत? शिवीगाळ करतायेत? किंवा त्यांच्या जेंडर वरून त्यांना चिडवितायेत? की त्यावरून हावभाव करतायेत?

ही घटना जेव्हा चार चौघांसमोर घडते तेव्हा ते खरोखरच खूप भीतीदायक आणि धक्कादायक असते. अनेकदा मुलांनी समजमा ध्यमांचे ग्रुप केलेले असतात ज्यात या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असते.

(latest marathi news)

मुलाची 'स्व' ची प्रतिमा ढासळायला लागते..

या घटना जेव्हा जेव्हा वर्गात सगळ्यांसमोर सारख्या सारख्या घडायला लागतात तेव्हा त्या लहान मुलाची स्व ची प्रतिमा ढासळायला सुरुवात होते.

त्याचे परिणाम त्याच्यात नकारात्मक भावना निर्माण होतात. अनेकदा यामुळे मुले मला शाळेतच जायचं नाही अशी भूमिका घेतात.

तरीही जेव्हा दामटवून या बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पालक मुलांना शाळेत पाठवतात तेव्हा आपल्याबाबत हे असच होणार, आपण पीडित आहोत आणि आपण हेच डिजर्व करतो अशा नकारात्मक भावना वाढीस लागतात.

त्या मुलाचा बुलिंग ते ट्रॉमा असा प्रवास सुरु होतो..

एकदा स्व ची प्रतिमा (Self Image) ढासळली की तो मुलगा किंवा मुलगी यांच्यावर खूप मोठा मानसिक परिणाम होतो. याचा परिणाम त्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर होऊ लागतो. आणि बुलिंग ते ट्रॉमा (bullying to trauma) असा प्रवास सुरु होतो.

वर नमूद केलेला प्रकार हा अतिशय गंभीर आहे. ही मुलं सर्वांसमोर सेक्शुअल ऍक्ट करत होती. जेव्हा चार चौघांमध्ये त्या मुलाला अश्या प्रकारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक त्रास दिला जातो त्यामुळे त्या बालमन ते सगळं पेलू शकत नाही.

रॅगिंग बद्दल बोलतो, बुलिंगबद्दल कोणीच का बोलत नाही?

शाळा कॉलेजमध्ये रॅगिंग (raging in school and colleges) या विषयाबाबत बऱ्यापैकी जागृती झाली आहे. त्याविषयी कायदे देखील आहे, त्या कायद्यांची माहिती असल्याने जरब देखील आहे. मात्र बुलिंगबाबत असे कायदे नाहीत.

त्यामुळे अशा घटना घडल्यावर यावर आता काय शिक्षा द्यायची, याचे काही कायदे आहेत का, याची चाचपणी सुरू होते.

बुलिंगबद्दल प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना होणाऱ्या शिक्षेची कल्पना द्यायला हवी

मुळात बुलिंग या विषयात शाळेने शिक्षा ठरवीत असताना त्याचे गांभीर्य मुलांना, शिक्षकांना आणि पालकांना आधीच सांगावे. सर्वानुमते शिक्षा ठरवावी. जेणेकरून अशा घटना घडण्याआधी सर्वच जणांना त्याचे गांभीर्य असेल.

तसेच शिक्षा अशी असावी ज्यातून सुधारणेला वाव असेल. माझ्या पाहण्यात आलेल्या एका घटनेत शाळेने बुलिंग केलेल्या मुलाला शाळेत त्या विषयाची जागृती करणारे पोस्टर लावण्यास सांगितले होते. अर्थात वरील घटनेएवढी ती घटना गंभीर नव्हती.

मुलांना भावनिकरित्या सक्षम (Emotionally Strong ) करणेही आवश्यक

लहानपणी घडलेली एखादी घटना एखाद्याच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारी ठरू हकते. समाजात वावरत असताना अनेक प्रकारच्या, वेगवेगळ्या स्वभावाच्या, शरीरयष्टीच्या, गुंड प्रवृत्तीच्या मुलांचा सामना मुलांना करावा लागतो.

हे करत असताना अशा वेळी परिस्थिती कशी हातळावी याबाबत मुलांना आधीच माहिती द्यायला हवी . कुठे मदत मागायची? कुठे नाही म्हणायचं? नाही म्हणजे नाहीचा स्टँड, मुलं कमी पडताएत तिथे पालक म्हणून स्टँड घेणे आवश्यक आहे.

'बघे पालक' यांची भूमिका काय असायला हवी?

अशा प्रकारच्या घटनांमध्ये तीन प्रकारचे पालक असतात. गुन्हेगाराचे पालक जे अनेकदा माझ्या मुलाने असे केलेच नाही असे म्हणणारे असतात. दुसरे पीडित मुलाचे पालक जे खचलेले असतात तसेच शिक्षेसाठी आग्रही असतात. आणि तिसऱ्या प्रकारात 'बघे पालक' जे हा सगळा प्रकार बघत असतात आणि कोणतीच भूमिका घेत नसतात.

परंतु एकूणच अशा घटना थांबविण्यासाठी या बघ्या पालकांनी भूमिका घ्यायला हवी. त्यांनी पीडित मुलाच्या पालकांसोबत उभं राहणं गरजेचं आहे. अशा वृत्ती वाढायला नको म्हणून दबाव गट निर्माण करायला हवेत.

आमची मुलं अशी नाहीतच हा खोटा आत्मविश्वास देखील नसावा

अनेकदा आमच्या मुलाने असे करणे शक्यच नाही असा खोटा आत्मविश्वास मुलांच्या पालकांना असतो.

या विषयात शांतपणे मुलांशी संवाद साधून खरे काय घडले आहे हे जाणून घेण्यापेक्षा आमच्या मुलांनी हे केलंच नाही हे पटवून देण्यात ते बरीचशी ऊर्जा खर्च करतात.

त्यातून गुन्हेगार मुलांना देखील सपोर्ट मिळतो. पालक आपल्या बाजूने आहेत म्हंटल्यावर आणखीन नव्या गोष्टी करण्याचं धाडस वाढतं.

शाळा पातळीवर नियमावली हवी - वसंत काळपांडे

याबाबत राज्य एसएससी आणि एचएससी बोर्डाचे माजी अध्यक्ष वसंत काळपांडे म्हणाले, पूर्वी महाविद्यालय पातळीवर असे प्रकार घडायचे जे आता शाळा पातळीवर घडताएत. गंभीर घटनांच्या बाबतीत शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली तयार करावी. हा विषय देशपातळीवरच्या सर्व शाळांना लागू असावा.

(SSC and HSC Board former chairperson)

हा विषय मुलांच्या शिक्षणाचा भाग हवा - दिनकर टेमकर

या विषयाबाबत राज्याच्या प्राथमिक शिक्षण (Primary education )विभागाचे माजी संचालक दिनकर टेमकर म्हणाले, मुख्य म्हणजे शिक्षकांना काही ठराविक मुलं कशी वागू शकतात याबद्दल अंदाज असतो, त्यांनी त्यांच्याविषयी जागरूक राहायला हवे.

तसेच शाळेच्या आवारात देखील cctv देखील लावायला हवेत. मुलांच्या शिक्षणात, मूल्याशिक्षणात या विषयाबाबत जगरुकतात करून द्यायला हवी.

शिक्षण विभाग या विषयात सर्व शाळांना मार्गदर्शक सूचना पाठवू शकतो. तसेच अशा गोष्टी शाळेच्या प्रातिष्ठेपायी लपवून ठेऊ नये अशा सूचना देऊ शकतो.

---------------

(Marathi news about school bullying)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT