job and emotion balance
job and emotion balance esakal
प्रीमियम महाराष्ट्र

नोकरीत भावनांना बाजूला ठेवणं तुम्हालाही अवघड जातं का?

Shraddha Kolekar

मुंबई : नोकरी करत असताना आपण जसे पैशांच्या बाबत संवेदनशील असतो त्याप्रमाणे कामाच्या ठिकाणी आपले पद, प्रतिष्ठा, आपले आतापर्यंतचे काम या सगळ्या बाबींचा विचार करून त्याप्रमाणे व्यक्त होत असतो.

काम करत असताना स्वप्रतिमेचे दडपण घेऊन वावरत असतो, या प्रतिमेला फार धक्का लागू नये यासाठी प्रयत्न करत असतो.

बऱ्याच लोकांसाठी नोकरी हे एक कमावण्याचे साधन असण्यासोबत त्यांची स्वतःची ओळख असते. परंतु नोकरीत असे अनेक प्रसंग येतात जेव्हा तुम्ही कामाला कितीही तटस्तपणे पाहायचा प्रयत्न केला तरीही तुमच्या भावना त्यामध्ये गुंतल्या जातात.

यातून काही गोष्टी मनाजोगत्या नाही झाल्या किंवा यात काही अनपेक्षित बदल झाले की एक प्रकारची निराशा, चिंता वाटू लागते.

ज्या व्यक्ती भावनिकरीत्या बुद्धिमान असतात त्या अत्यंत चांगल्या रीतीने या गोष्टी हाताळताना दिसतात. या विषयातील काही संशोधनपर निबंध देखील सादर करण्यात आले आहेत ज्यामध्ये कामात सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारे भावनिक गुंतवणूक झाललेली पाहायला मिळाली आहे.

या विषयी मानसशास्त्रज्ञ स्वप्नील पांगे कामाच्या ठिकाणी कसे वागावे याबाबत सांगितले आहे, जेणेकरून कामाचा समतोल आणि भावना यांचा गोंधळ कमी होईल.

(How to behave at workplace?)

१) भावनिकरीत्या बुद्धिमान स्वतःबद्दल पूर्वग्रह कामात आणत नाहीत

जेव्हा बॉसकडून एखाद्या वेळी नाव न घेता एखाद्या गोष्टीबाबत नाराजी व्यक्त केली जाते. त्यावेळी अनेकजण अस्वस्थ होताना दिसतात. त्यांना कदाचित आपणच समोरच्याच्या डोळ्यासमोर आहोत असे वाटू लागते. कारण कोणतीही गोष्ट वैयक्तिकरित्या घ्यायची माणसांची ही 'टेंडन्सी' असते.

मात्र भावनिकरीत्या बुद्धिमान लोक मागचे कोणतेही पूर्वग्रह आणि सध्याच्या परिस्थितीचा संबंध लावत बसण्यात वेळ घालवत बसत नाहीत. ते वर्तमानात काय घडत आहे, यावर जास्त लक्ष केंद्रित करताना दिसतात. यामुळे ते कामावर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रीत करू शकतात.

२) नियंत्रणातील आणि नियंत्रणाबाहेरील गोष्टींची त्यांना जाणीव असते

एखादी गोष्टी कितीही प्रयत्न केली तरीही ती जर नियंत्रणाबरच असणार असेल तर त्यावर काम करून उपयोग नाही हे ते जाणून असतात त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित न करता नियंत्रित असणाऱ्या गोष्टींवर या व्यक्ती लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे त्यांना तुलालनेने त्रास कमी होतो.

(How to balance emotion and work?)

३ ) स्वतःचे महत्व कोणालाही पटवून द्यायला जात नाहीत

या व्यक्ती मी किती कामात व्यस्त आहे, मला किती काम आहे, मी किती वेळ काम करतो अशा कोणत्याही गोष्टी दाखवायला जात नाही.

कारण त्यांना माहिती असतं की बोलण्या आणि दाखविण्यापेक्षा काम अचूक आणि वेळेत करणे जास्त महत्वाचे आहे आणि त्याचेच मोजमाप केले जाते. त्यांना माहिती असतं की अश्या प्रकारे स्वतःचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केविलवाणा ठरू शकतो.

४) टीका व्यक्तिगत घेत नाहीत

एखादी टीका झाली तर ती वैयक्तित मनाला लावून घेण्यापेखा किंवा त्यावर स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा त्यात आपले काय चुकले यावर ते काम करतात. याउलट इमोशनल माणसं ते मनाला लावून घेत स्वतःवर आणि कामावर परिणाम करून घेतात.

५) संपूर्ण आयडेंटिटी उलगडून दाखवत नाही

नोकरीच्या निमित्ताने अनेक व्यक्तींवर प्रभाव टाकण्याच्या संधी येतात. यावेळी या व्यक्ती गरजेपेक्षा जास्त आपली 'आयडेंटिटी डिस्क्लोज' करतात. पण ज्या व्यक्ती भावनिक बुद्धिमान असतात त्या अनावश्यक पार्शवभूमी सांगत नाहीत.

अनेकदा तुमच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवरून समोरची व्यक्ती तुम्हाला जज करत असते. त्यामुळे अनावश्यक माहिती नकारात्मक प्रभाव टाकू शकते ही बाब या भावनिक बुद्धिमान लोकांना माहिती असते.

(latest news about work life balance)

६) वैयक्तिक हेवेदावे कामात आणत नाहीत

एखाद्या व्यक्तीसोबत मतभेत असतील तरीही त्यांच्यासोबतच वागताना सार्वजनिक पातळीवर त्यांचे वर्तन बॅलन्सड असते. व्यक्तीबद्दलची वैयक्तिक मते कामात आणली जात नाहीत. त्यामुळे कामात वैयक्तिक हेवेदावे न आणणारी व्यक्ती अधिक प्रभाव पडते.

७) आदर देतात आणि आदर मिळवतात

एखादी अत्यंत अनुभव असणारी व्यक्ती त्यांच्यासमोर असलं आणि ते त्या व्यक्तीच्या वरच्या पदावर असतील, त्यांची मते त्यांना कितीही आऊटडेटेड वाटत असतात तरी त्यांच्या विचारांना आदर देतात. व्यक्ती म्हणून सहकाऱ्यांशी देखील आदराने वागतात.

कोणालाही दुर्लक्ष करून वाईट वागणूक देत नाहीत. एखाद्याला अती आदर आणि दुसऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष असा प्रकारही जे करत नाहीत. यामुळे अनेकांना त्यांच्याविषयी भीतीयुक्त आदर न वाटत मनापासून आदर वाटतो, आणि तसाच आदर त्यांना त्याच लोकांकडूनही परत मिळतो.

(latest Marathi news about working culture)

८) काहीतरी गमावण्यात देखील ते संधी मानतात

अनेकदा नोकरी गमावणे, पद बदलले जाणे अशा गोष्टी घडल्या की माणसे असुरक्षित वाटून घेतात. होणाऱ्या नुकसानाला घाबरतात. मात्र भावनिक बुद्धिमान लोक कदाचित मी दुसऱ्या पदावर जास्त चांगलं काम कारेन असे किंवा व्यवसाय करण्याची वेळ आहे अशा नजरेने याकडे पाहतात.

समांतर संधींचा शोध घेतात. ते कोणत्याही भावनेत न गुंतता, त्याची लाज वाटून न घेता स्वतःसाठी योग्य असा निर्णय घेतात.

९) समस्यांवर चर्चा करण्यापेक्षा त्या सोडविण्यावर भर देतात

कामाच्या बाबतीतल्या समस्यांबाबत वायफळ चर्चा, जाहीर नाराजी, दोषारोप करण्यापेक्षा त्या समस्या प्रत्यक्ष कशा सोडविल्या जातील यावर भर देणारी मंडळी भावनांच्या कसोटीवर स्वतःला योग्यरित्या उतरवितात.

१०) अतिसंवेदनशील किंवा अति कोरडे वागत नाहीत

ज्यांचा स्वतःच्या भावनांवर कंट्रोल असतो त्या व्यक्ती कुठंही मुद्दा अतिसंवेदनशीलपणे किंवा अति कोरड्या पद्धतीने हाताळत नाहीत.

भावना आणि कोरडेपणा यांचा प्रमाणात बांध ज्यांना घालता येतो. तसेच मी आणि आम्ही यात ज्यांना फरक करता येतो त्यांना नोकरीत भावना आणल्या तरी त्याचा त्रास होण्याइतपत टोक गाठली जात नाहीत.

----------------

(balance between EQ and IQ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT