Home Buyers Guide Dinesh Oak
Home Loan

Home Buyers Guide : पहिल्यांदा घर खरेदी करताना काय काळजी घ्याल?

पहिल्यांदा घर घेताना कोणत्या गोष्टी तपासणे गरजेचे, वाचा एका क्लिकवर

Pooja Karande-Kadam

Home Buyers Guide: सध्या एखादी जागा अथवा घर खरेदी करणे फारच जिकरीचे बनले आहे. कारण, घर खरेदी करताना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे, त्यामुळे सामान्यांना ही फसवणूक न परवडणारीच आहे.

आज सामान्य माणसाला जागा घेऊन घर बांधणे खूपच त्रासदायक झालेले आहे. त्यापेक्षा त्याला फ्लॅट घेणे सोयीस्कर वाटायला लागलेले आहे.

देशात जागेची कमतरता आहे. त्यामुळेच छोट्या छोट्या वन रूम किचनमध्ये सामान्य माणसाची स्वप्न रंगली आहेत. कारण, सध्या जमीन खरेदी करणे, घर बांधणे हे अवाक्याच्या बाहेर गेले आहे. घर बांधण्याचा खर्चही सातत्याने वाढत आहे.

त्यामुळे मोठ्या शहरांमध्येच नव्हे, तर छोट्या भागातही घरे महाग झाली आहेत. जर तुम्ही पहिल्यांदाच घर घेणार असाल. तर तुमची फसवणूक होऊ नये यासाठी काय करता येईल हे पाहुयात.

मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्या

जर तुम्ही कर्ज घेऊन घर विकत घेत असाल तर संपूर्ण विचार करून मगच निर्णय घ्या. आजकाल बँका तुमच्याकडून फक्त डाउन पेमेंट मागतात. उर्वरित रक्कम ते तुम्हाला गृहकर्ज म्हणून देतात. तुम्ही तुमच्या बचतीपेक्षा जास्त डाउन पेमेंट केल्यास तुमच्यावर कर्जाचा बोजा कमी होईल.

होम लोन मार्केट

बाजारात अनेक बँका आणि एनबीएफसी होम लोन ऑफर करत आहेत. व्याजदर, प्रक्रिया शुल्क आणि इतर औपचारिकता तपासल्यानंतर तुम्ही पाच-सात बँका/एनबीएफसीकडून कर्ज घेतल्यास तुम्हाला आणखी चांगला सौदा मिळू शकतो.

अनेक बँका आता गृहकर्जासह कॅशबॅक ऑफर देत आहेत. मासिक हप्त्याचे ओझे कमी करण्यासाठी बँकिंग नियामक रिझर्व्ह बँकेनेही बँकांना सूचना दिल्या आहेत.

घर घ्यायचं स्वप्न नक्की पूर्ण करा, पण काळजी घेऊन

तूमचा पगार किती आहे

प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांनी आगामी काळात त्यांचा पगार किती वाढू शकतो हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या भविष्यातील उत्पन्नाच्या आधारे घर खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. गृहकर्ज घेऊन घर खरेदी करणे हा दीर्घकालीन सौदा आहे, त्याआधी आवश्यक गृहपाठ करा

अडचणी येऊ शकतात

आयुष्य क्षणभंगुर आहे. तुमची कारकीर्द आयुष्यात कोणत्या मार्गावर जाईल याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. आयुष्यातील प्राधान्यक्रमही काळानुसार बदलत राहतो. लग्नानंतरच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे, मुलांसाठीचा खर्च इत्यादींचा तुमच्या खिशावर परिणाम होतो. यामुळे, मासिक हप्ता भरण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

खर्चावर नियंत्रण ठेवा

खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही उर्वरित खर्च पुढे ढकलू शकता. पण, कर्जाचा हफ्ता त्याच्या नियोजित वेळेवर जाईल. जर ईएमआय वेळेवर भरला नाही, तर बँक तुमच्यावर खूप दंड आकारते. यामूळे तूमचे क्रेडिट रिपोर्ट देखील खराब आहे.

स्वस्त घर विकत घ्या

पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी आहे. आर्थिक सल्लागार म्हणतात की, तुम्ही सर्वात स्वस्त घर घ्या. उगी प्रशस्त आणि स्टेटस राखण्यासाठी मोठं घर खरेदी करू नका. त्यामूळे तूमचाच ताप वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT