10th exam Will Start from tomorrow 
पुणे

विद्यार्थ्यांनो, All The Best; दहावीची परीक्षा उद्यापासून

सकाळवृत्तसेवा

पुणे : महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करण्यापूर्वी महत्वाचा टप्पा असलेली इयत्ता 10वीची परीक्षा उद्यापासून (मंगळवार) राज्यभरात सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणतेही टेंशन न घेता परीक्षेला समोरे जावे, निकाल नक्कीच चांगला लागेल. तुम्हा सर्वांना शुभेच्छा! राज्यभरात 22 हजार 586 शाळांमधली 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी  परीक्षा देणार असून, यासाठी 4 हजार 979 केंद्र निश्‍चीत केली आहेत. 
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागात 10वीची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 23 मार्च असेल, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषेदेत दिली. 

राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी नोंदणी झालेली आहे. यात 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थिनी आहेत. तर 110 तृतीयपंथी विद्यार्थी आहेत. 

पुणे : एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यासमोरच झाडली गोळी...

मंडळाने अधिकृत छपाई केलेले 10वीचे अधिकृत वेळापत्रक ग्राह्य धरावे, वॉट्‌सऍप किंवा इतर माध्यामातून आलेल्या वेळापत्रकावर विश्‍वास ठेऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर विषयासमोर तारीख व परीक्षेचे सत्र सकाळचे आहे की दुपारचे याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे वेळेबाबत गोंधळ करू नये. वैद्यकीय व इतर अपरिहार्य कारणामुळे प्रात्यक्षीक परीक्षा देऊ न शकलेल्यांची परीक्षा 24 आणि 26 मार्च रोजी जिल्हानिहाय केंद्रावर होणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. 

अक्षय कुमार वसवणार ट्रान्सजेंडर्ससाठी घरं!

80 उपद्रवी केंद्र 
परीक्षेत गैरप्रकार चालणारे व संवेदशील असे 80 उपद्रवी परीक्षा केंद्र आहेत. या केंद्रावर बैठे पथक नियुक्त केले आहे. शिवाय भरारी पथकांच्या आचानक भेटींही जास्त आहेत. राज्यात सर्वाधिक जास्त उपद्रवी केंद्र नाशिक विभागात आहेत, मात्र त्यांची संख्या सांगण्यात आली नाही. दरम्यान, परीक्षेमध्ये कॉपी होऊ नये यासाठी मंडळाने 273 भरारी पथके नेमली आहेत. ते आचानक कोणत्याही शाळेत जाऊन तपासणी करू शतकतात. त्याशिवाय प्रत्येक जिल्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन केली आहे, असे काळे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केंद्रसंचालकास संपूर्ण अधिकार 
परीक्षेच्या काळात संपूर्ण परीक्षा केंद्र परीक्षा संचालकाच्या ताब्यात असते अशा वेळी परीक्षा काळात कोणालाही मोबाईल वापरू देऊ नये, तसेच परीक्षेशी संबंधित व्यक्तींशिवाय इतर कोणालाही व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आत येऊ देऊ नये. याचा अधिकार केंद्र संचालकाला आहे. 


आधी तिचा विनयभंग केला मग, तक्रार दिली म्हणून पुन्हा....

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन 
विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतच्या अडचणी सोडविण्यासाटी हेल्पलाइन सुरू आहे. त्यांचे विभागीय क्रमांक : पुणे 9423042627, 
मुंबई (022) 27881075, 27893756, कोल्हापूर (0231) 2696101, 2696102, 2696103, अमरावती (0721) 2662608, लातूर ( 02382) 251633, कोकण (02352) 228480, नाशिक (0253) 2592141, 2592143, नागपूर (0712) 2565403, 2553401, औरंगाबाद (0240) 2334228, 2334284, 2331116. याशिवाय राज्य मंडळाचीदेखील हेल्पलाइन आहे. त्याचे क्रमांक : 020 25705271, 25705272. 

पुणे : एकतर्फी प्रेमातून त्याने तिच्यासमोरच झाडली गोळी...

पुणे विभागातील विद्यार्थी संख्या     जिल्हा विद्यार्थी विद्यार्थीनी              एकुण 
पुणे   76145                                      63783                             139928 
नगर 44256                                      31838                                76094 
सोलापूर 39678                                  29942                               89620 
एकुण 160079                                  125563                            285642 


- 3 मार्च ते 23 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा 
- परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या आधी अर्धा तास जावे 
- परीक्षेच्या आधी 10 मिनीट प्रश्‍नपत्रिका वाचनासाठी मिळणार 
- दोन विद्यार्थ्याची स्वाक्षरी घेऊन सीलबंद प्रश्‍नपत्रिकेचे पाकीट फोडले जाणार 
- उत्तरपत्रिका व पुरवण्या यांच्यात आदलाबदल होऊ नये यासाठी बारकोडची छपाई 
- राज्यभरात 9 हजार 45 दिव्यांग विद्यार्थी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT