corona  
पुणे

हवेलीकरांनो, मर्द को दर्द नही होता...हा डायलाॅग सिनेमातच बरा...

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. थेऊर, उरुळी कांचन, लोणी काळभोर, कोरेगाव मूळ व कुंजीरवाडी या पाच गावात गेल्या दीड दिवसांत तब्बल बारा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले अनेक जण राजरोसपणे गल्लीबोळात फिरत आहे. मात्र, तरीही नागरिक मर्द को दर्द नही होता या डायलाॅगप्रमाणे "आपल्याला कोरोना होऊच शकत नाही" या अविर्भावात बिनधास्तपणे वावरत आहेत. त्यातून कोरोनाचा धोका कैकपटीने वाढला आहे. 

पूर्व हवेलीत गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. थेऊर, उरुळी कांचन, लोणी काळभोर, कोरेगाव मूळ व कुंजीरवाडी या पाच गावात गेल्या दीड दिवसांत तब्बल बारा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एकट्या थेऊर गावातील सहा रुग्णांचा समावेश आहे. 

आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व मित्र, अशा 57 जणांचे स्वॅब (घशातील द्रव) कोरोना तपासणीसाठी लोणी काळभोर येथील कोरोना केअर सेंटरच्या माध्यमातून मंगळवारी (ता. २३) सकाळी पाठवले आहेत. ते संध्याकाळी उशिरा येणे अपेक्षित आहे. मात्र, या 57 जणांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास पूर्व हवेलीत धोका वाढू शकतो. 

या बारा कोरोनाबाधित रुग्णांपैकी चार जण कोरोनाच्या प्रसारासाठी अधिक धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. थेऊर येथील पाचपैकी दोन जण व्यावसायिक आहेत. त्यातील दोघांच्या सानिध्यात मागिल चार दिवसांपासून अनेक जण आले आहेत. एक रुग्ण मागिल काही दिवसांपासून थेऊर परिसरात भजनासाठी जात होता. त्यामुळे भजनासाठी जमलेल्या पंधराहुन अधिक नागरिकांचीही तपासणी करण्याची गरज आहे. लोणी काळभोर येथील रुग्णांच्या संपर्कात त्याच्याच घरातील 39 जण आले आहेत.  

हवेली तालुका आरोग्य विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव परिसरातील कोरोनाबाधित सत्तावीस वर्षीय तरुण हॉटेल चालक थेऊर येथील रहिवाशी आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या बारा जणांपैकी त्याचे वडिल व तीन भाडेकरू, असे चार जण सोमवारी (ता. २२) कोरोनाबाधित असल्याचे आढळुन आले होते. तर, थेऊर येथील एका कंपनीतही एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. कुंजीरवाडी हद्दीतही सोमवारी दिवसभरात दोन रुग्ण आढळुन आले आहेत. त्यांच्या समवेत लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यास कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाले. तर, कोरेगाव मूळ येथील एक महिला व एक पुरुष, असे दोन जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. उरुळी कांचन येथील डाळिंब रस्ता परिसरात एक 25 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आहे. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मात्र, विशेष बाब म्हणजे मागिल बारा जण कोरोनाबाधित आढळूनही पुर्व हवेलीमधील नागरिक मर्द को दर्द नही होता, या डायलॉगप्रमाणे "आपल्याला कोरोना होऊच शकत नाही" या अर्विभावात बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसुन येत आहे.

याबाबत लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव यांनी इशारा दिला की, नागरिकांनी घऱाबाहेर पडताना मास्क लावणे, ही काळाजी गरज बनली आहे. मात्र, सत्तर टक्क्यांहून अधिक नागरिक घराबाहेर पडताना मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत नागरीकांनी योग्य ती काळजी न घेतल्यास भविष्यात कोरोनाचा आकडा याहुनही अधिक वाढू शकतो. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT