Pune_RTO 
पुणे

लॉकडाउनमध्येही 'आरटीओ' मालामाल; तिजोरीत जमा झाली एवढी गंगाजळी! 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनच्या तीन महिन्यांच्या काळातही प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पुणे विभागाच्या तिजोरीत 175 कोटी 67 लाखांची रक्कम जमा झाली आहे. 

देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाला. तेव्हापासून आरटीओचेही कार्यालय बंद होते. 18 मे पासून काही प्रमाणात वाहनांची नोंदणी सुरू झाली. तेव्हापासून 31 मे पर्यंत सुमारे 22 हजार 493 वाहनांची नोंदणी आरटीओकडे झाली आहे. त्यातून तब्बल पावणे दोनशे कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. एप्रिल, मे महिने वाहन उद्योगासाठी अडचणीसाठी गेले असले तरी, मे महिन्याचा उत्तरार्ध आणि जून महिन्याचा पंधरावडा चांगला गेला आहे, असे वाहतूक क्षेत्रातून सांगण्यात आले. 

ग्राहकांनी बुक केलेल्या अनेक वाहनांची नोंदणी 18 मे नंतर झाली आहे. त्यात प्रामुख्याने दुचाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश आहे. अन्य वाहनांची विक्री तुलनेने कमी झाली आहे. परंतु, परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे निरीक्षण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी नोंदविले. 18 मे 15 जूनपर्यंत 1669 मोटारसायकली तर, याच काळात 1068 मोटारींची नोंदणी झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मार्चमध्ये 17 तारखेपर्यंत नोंदणी चांगली झाली. मात्र, एप्रिल- मे महिना लॉकडाउनमुळे अवघड गेले. आता परिस्थिती सुधारत आहे. येत्या दोन महिन्यांत गाड्यांच्या नोंदणीची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे. 
- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोटारी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची चौकशी आता वाढू लागली आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत  मोटार विक्री सुमारे 40 टक्क्यांनी घटली आहे. पुढील महिन्यात विक्री वाढेल, अशी अपेक्षा आहे.
- हरिंदरसिंग, सीईओ, ऑटोमोबाईल डिव्हिजन, गारवे ग्रुप

दुचाकी विक्रीचा खप 30 टक्क्यांपर्यंत रिकव्हर झाला आहे. तर, गाड्या सर्व्हिंसिंगला येण्याचे प्रमाणही 70 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत आहे.
- सागर पाषाणकर, पाषाणकर ऑटो

वाहनांचा प्रकार मार्च एप्रिल मे एकूण 
दुचाकी 14287 688 185 15610
चार चाकी 3038 186 445 3669
अन्य वाहने 3479 160 25 3664
एकूण वाहने 20804 1034 655 22493

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT