Corona-Pune 
पुणे

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; एका दिवसांत कोरोनामुक्त झाले तब्बल 194 रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना रुग्णांचा आकडा 135 पर्यंत जाताच शनिवारी घबराट पसरली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे, रविवारी मात्र पुणेकरांना सर्वात मोठा दिलासाही मिळाला; तो म्हणजे एका दिवसांत तब्बल 194 रुग्ण कोरोनामुक्त झाले. विशेष बाब, बरे झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह आतापर्यंत एक हजार रुग्ण ठणठणीत झाले आहेत.

दुसरीकडे, याच दिवसभरात नवे 102 रुग्ण सापडले असून, तेरा महिन्याच्या मुलीसह पाच रुग्णांचा बळी गेला आहे. शहरातील मृतांची संख्या 145 पर्यंत गेली असून, आणखी 92 जणांची स्थिती गंभीर आहे. त्यातील 17 जण अतिदक्षता विभागात (आयसीयू) आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, ती आता रोज साधारपणे शंभरच्या पुढे जात आहे. तेव्हाच, कोरोनामुक्तांचेही प्रमाण वाढत आहेत. महापालिकेसह खासगी रुग्णालयांत 14 ते 17 दिवस उपचार घेतलेल्या 194 जणांचा शेवटचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले. 

शहरात आतापर्यंत 22 हजार 751 नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी झाली आहे. त्यापैकी 2 हजार 482 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर उर्वरित नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

कोरोनाची लागण झाल्यानंतर ससून उपचार घेत असलेल्या 13 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. कोरोना झालेल्या मुलीला 4 मेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान रविवारी सकाळी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. तिला अन्यही आजार होते. त्याशिवाय, गंज पेठेतील 37 वर्षांच्या व्यक्तीचाही मृत्यू झाल्याची नोंद आहे. ही व्यक्ती 7 मेपासून रुग्णालयांत होती. येरवड्यातील 82 वर्षांच्या व्यक्तीचाही मृतांमध्ये समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT