Pathardi-Mumbai Bus esakal
पुणे

पाथर्डी-मुंबई बसची दुभाजकाला जोरात धडक, 22 प्रवासी जखमी; चालकासह 14 प्रवाशांवर वाघोली, हडपसरसह मुंबईत उपचार

पाथर्डी-मुंबई बस दुभाजकला धडकून सुमारे २० ते २२ प्रवासी जखमी झाले.

सकाळ डिजिटल टीम

ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने त्या ट्रकची धडक वाचविण्यासाठी बस दुभाजकाला धडकली. अनेक प्रवासी झोपेत होते.

वाघोली : पाथर्डी-मुंबई बस दुभाजकला धडकून सुमारे २० ते २२ प्रवासी जखमी झाले. यातील चालकासह सुमारे १४ प्रवाशांवर वाघोली, हडपसर व मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावर पेरणे फाटा टोल नाक्याजवळ घडली. पाच ते सात प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. ते उपचारानंतर घरी परतले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी-मुंबई बस नगर येथून निघाल्यानंतर सुपा येथे जेवणासाठी थांबली. तेथील थांबा घेतल्यानंतर बस पुण्याकडे निघाली. पेरणे फाटा येथे बसच्या पुढे लोखंडी सळ्या असलेला ट्रक होता. त्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने त्या ट्रकची धडक वाचविण्यासाठी बस दुभाजकाला धडकली. अनेक प्रवासी झोपेत होते.

बस धडकल्याने अनेक प्रवाशांना पुढील सीटचा चेहऱ्याला मार लागला. काही प्रवासी सीटमध्ये अडकून पडले होते. मागील सीट पुढील सीटवर आदळले. त्यावेळी बसमध्ये सुमारे 38 प्रवासी होते. घटना कळताच लोणीकंद पोलीस, वाहतूक विभागाचे कर्मचारी घटना स्थळी पोहचले. त्यांनी बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णवाहिका बोलावून वाघोलीतील खासगी रुग्णालयात पाठविले. सीट खाली अडकलेल्या प्रवाशांची सुटका करून त्यांना रुग्णालयात पाठविले.

बसमधील सर्व प्रवाशांना उतरविल्यानंतर बस क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. एसटी विभागाला माहिती कळाल्यानंतर एसटीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी व रुग्णालयात पोहचले. त्यांनी रुग्णांना तातडीची मदत केली. वाघोली येथील खासगी रुग्णालयात ११ रुग्णांवर, हडपसर येथील रुग्णालयात एका रुग्णांवर तर एसटी चालकावर मुंबई येथील रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एकाच कुटुंबातील सहाजण जखमी

या अपघातात पाथर्डी येथील संदीप ज्ञानोबा सानप हे पत्नी दोन मुले व मेहुणीसह मुंबई येथे जाण्यासाठी प्रवास करीत होते. या अपघातात हे सर्व जण जखमी झाले. त्यांच्यावर वाघोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींचे नातेवाईक मुंबईतून दुचाकीवरुन पुण्यात

पाथर्डी येथील घोडके दाम्पत्य मुंबईला जात होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घोडके यांचे नातेवाईक मुंबई येथून दुचाकीवरुन वाघोलीत रुग्णालयात पोहचले. या अपघातात घोडके या वृध्द महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला.

एसटी महामंडळाच्या लाल रंगाच्या काही बसेसची स्थिती अत्यंत वाईट आहे. चांगल्या स्थितीत नसताना त्या बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडतात. यामुळेच असे अपघात होतात. लांब पल्ल्याच्या मार्गावर उत्तम स्थितीतील बसेस सोडणे गरजेचे आहे.

-फ्रान्सिस घोडके, जखमीचे नातेवाईक

एसटीतील जखमींची नावे

  • १) सतीश बाबासाहेब वारे ( वय ४५ ) ( एस टी चालक )

  • २) संदीप ज्ञानोबा सानप (वय ३८ )

  • ३) कामिनी सानप (वय 30 )

  • ४) वेदिता सानय (वय ८ )

  • ५) वेदांत सानप (वय 3 )

  • ६) रुपाली सानप (वय 30 )

  • ७) अंजीनी सानप (सर्व मूळ रा. पाथर्डी, नगर )

  • ८) सुभद्रा भाऊराव घोडके ( वय ८० )

  • ९) भाऊराव संताराम छोडके ( वय ८२ )

  • १०) साई संजय तांबे (वय 30 )

  • ११) शुभम झिरपे ( रा. शेवगाव, नगर )

  • १२) संभाजी विष्णु जायभाय (वय ३४, रा वाळुंज, पाथर्डी )

  • १३) दयानंद भिमराव पाटेकर ( वय २७, रा शिरूर )

  • १४ ) राजु लासे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT